आता WhatsApp वर मिळणार ब्लु टिक; कंपनीचे ग्राहकांना खास गिफ्ट

टाइम्स मराठी । फेसबुक, इन्स्टाग्राम प्रमाणे आता प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp वर सुद्धा ब्लु टिक मिळणार आहे. म्हणजेच WhatsApp अकाउंट सुद्धा व्हेरिफाय करण्यात येणार आहे. खास करून बिझनेस करणाऱ्या यूजर्सना ही ब्लु टिक देण्यात येणार आहे. त्यासाठी व्हेरिफिकेशन बॅज खरेदी करावा लागेल. कंपनीने बिझनेस अकाउंट साठी ही खास सुविधा आणली आहे.

   

WhatsApp बाबत सर्व माहिती देणाऱ्या WABetaInfo नुसार, हा पर्याय सध्याच्या व्हॉट्सअॅप प्रीमियम सबस्क्रिप्शनची जागा घेईल आणि बिझनेससाठी अनेक वेगवेगळे फीचर्स देईल. येत्या काही दिवसात यूजर्सना हे नवं अपडेट WhatsApp मध्ये दिसेल. यासाठी बिजनेस मेटा वेरिफाइडचे सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. त्यानंतर ग्राहकांना सदर बिझनेस अकाउंट वेरिफाइड बैज सह म्हणजे ब्लु टिक मध्ये दिसेल. आणि युजर्सला नवनवीन फीचर्स सुद्धा मिळतील.

हे फीचर्स फक्त बिझनेस व्हाट्सअप मध्ये देण्यात येईल. तसेच हा वेरिफिकेशन ऐच्छिक असेल, यासाठी कोणतेही बंधन कंपनीने आपल्या यूजर्सना घातलेलं नाही. सध्या तरी या सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत किती असेल हे अजून कंपनीने जाहीर केलेले नाही. यापूर्वी फेसबुक आणि इंस्टाग्राम ने सुद्धा आपल्या यूजर्ससाठी ब्लु टिक सबस्क्रिप्शन प्लॅन जाहीर केला होता. सध्या भारतात Android आणि iOS वर दरमहा ६९९ रुपये सबस्क्रिप्शन प्लॅन साठी द्यावे लागतील. तर वेब यूजर्स ना दर महिन्याला ५९९ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.