Whatsapp Broadcast : एका क्लिकवर द्या सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा; Whatsapp वरील हे फीचर्स तुम्हांला माहितेय का?

टाइम्स मराठी । Whatsapp या इन्स्टंट मेसेजिंग ॲप च्या माध्यमातून चॅटिंग करणे आणखीनच मजेशीर झाले आहे. कारण यामध्ये मेटा कंपनीने वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले आहे. त्याचबरोबर व्हाट्सअप युजरची सिक्युरिटी आणि प्रायव्हसीवर देखील लक्ष ठेवते. पूर्वी Whatsapp च्या माध्यमातून फक्त चॅटिंग केलं जात होते. परंतु आता वेगवेगळे फीचर्स व्हाट्सअप मध्ये लॉन्च करण्यात आल्यामुळे व्हाट्सअपच्या माध्यमातून ऑफिशियल पर्सनल कामे देखील केली जातात. यासोबतच बिझनेस आणि पेमेंट हे ऑप्शन देखील आता उपलब्ध आहे.  सध्या दिवाळी तोंडावर आली असून आपण Whatsapp वरून आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना शुभेच्छा पाठवत असतो. पण तुम्हाला माहित आहे का? व्हाट्सअपवर असं एक फिचर (Whatsapp Broadcast) आहे त्यामाध्यमातून तुम्ही एकाच वेळी अनेकांना मेसेज करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

   

काय आहे ब्रॉडकास्ट लिस्ट फीचर– Whatsapp Broadcast

व्हाट्सअप मध्ये वन टू मेनी कम्युनिकेशन ऑप्शन उपलब्ध आहे. या ऑप्शनला ब्रॉडकास्ट लिस्ट फीचर म्हटले जाते. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही एकापेक्षा जास्त लोकांना एकाच वेळी मेसेज पाठवू शकतात. जेणेकरून  तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप तयार न करता प्रत्येकाला सेपरेटली मेसेज पाठवता येईल. हे मेसेज किंवा पोस्ट एकाच वेळेस सर्वांना सेंड होईल. या ब्रॉडकास्ट लिस्टच्या माध्यमातून मेसेज रिसीवरला नॉर्मल पद्धतीने मेसेज सेंड केला जातो. आणि सेंडरकडून येणारा रिप्लाय हा तुम्हाला वैयक्तिक मिळेल.

या व्हाट्सअप युजर्स ला पाठवता येणार नाही मेसेज

या ब्रॉडकास लिस्ट फीचरच्या (Whatsapp Broadcast) माध्यमातून तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असलेल्या व्हाट्सअप युजर्स ला मेसेज पाठवू शकतात. परंतु ज्या व्यक्तींकडे तुमचा व्हाट्सअप नंबर सेव्ह नसेल, त्या व्यक्तींना तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट फीचर च्या माध्यमातून मेसेज पाठवू शकत नाही. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये ऍड केले असेल आणि तोच व्यक्ती व्हाट्सअप मध्ये देखील ऍड असेल परंतु त्या व्यक्तीकडे तुमचा नंबर सेव्ह नसेल तर ब्रॉडकास्ट लिस्ट फीचर काम करत नाही.

या पद्धतीने वापरा ब्रॉडकास्ट लिस्ट फीचर

1) सर्वात आधी व्हाट्सअप ओपन करा.
2) टॉप राईट साईडला तुम्हाला तीन डॉट दिसेल. त्या डॉट वर क्लिक करा.
3) त्यानंतर तुम्हाला न्यू ब्रॉडकास्ट ऑप्शन मिळेल.
4) या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट सिलेक्ट करण्याचे ऑप्शन मिळेल.
5). त्यानंतर तुम्हाला हवे असलेले कॉन्टॅक्ट निवडा.
6) यानंतर तुम्हाला राईट साईडने सर्वात खाली बरोबरची खून दिसेल.
7) त्यावर क्लिक करा आणि  तुमची ब्रॉडकास्ट लिस्ट तयार होईल.
8) ही लिस्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला ग्रुप प्रमाणे चॅट विंडो दिसेल.
9) या चॅट विंडोमध्ये मेसेज टाईप केल्यानंतर सेंड करा.
10) तुम्ही तयार केलेल्या लिस्ट मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व मेसेंजरला इंडिव्हिज्युअली मेसेज सेंड होईल.