तुम्हांलाही Whatsapp वर +92, +82, +62 नंबर वरून कॉल येतोय? वेळीच करा ‘हे’ काम

टाइम्स मराठी । भारतामध्ये सायबर क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतात डिजिटलायझेशन झाल्यापासून ऑनलाइन लोडिंगच्या समस्यांना सर्वांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच जर तुम्हाला Whatsapp वरून +92, +82, +62 यासारख्या नंबर वरून कॉल येत असेल तर तुम्हाला सावधानी बाळगणे गरजेचे आहे. यासाठी व्हाट्सअप ने कॉल सायलेंट फिचर वापरण्याचे आदेश दिले आहेत.

   

काही दिवसांपासून Whatsapp वर अनोळखी व्यक्तींचे कॉल येणे आणि मेसेजेस येणे हे प्रचंड वाढले असून यामुळे प्रॉब्लेम होण्याची शक्यता देखील प्रचंड वाढली आहे. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असून एक भीती देखील पसरली आहे. यासोबतच या फ्रॉड करणाऱ्या व्यक्तींकडे आपला नंबर कशा पद्धतीने पोहोचतो हे देखील पेचात पडण्यासारखं प्रश्न आहे. कारण कॉल येणारे नंबर भारतातील नसून दुसऱ्या देशांमधील कोड वरून येत आहे. अशा नंबर वरून मेसेज किंवा कॉल आल्यास त्यांच्याकडून जॉब अपॉर्च्युनिटी दिली जाते. त्यांच्याकडून पूर्णपणे युजर्सची मनधरणी केली जाते आणि एकदा आपण त्यांच्यात अडकलो तर त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन जाते.

Whatsapp ने केली नंबर Block करण्याची विनंती

92, +82, +62 या कोडच्या नंबर वरून फक्त जॉब अपॉर्च्युनिटी नाही तर तुम्ही आयफोन जिंकला आहे अशा प्रकारची आमिषे दाखवली जातात. या स्कीम मध्ये फसल्यानंतर लाखो करोडो रुपये आपल्या बँक अकाउंट मधून गायब होतात. अशावेळी पोलिसांकडे जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नसतो. पोलिसांकडे आतापर्यंत अशा प्रचंड केसेस आल्या असून या केसेसच्या माध्यमातून पोलीस देखील त्रस्त आहेत. म्हणूनच या कोडच्या नंबर वरून कॉल आल्यास तो नंबर ब्लॉक करण्याची विनंती व्हाट्सअपने केली आहे.

या देशातून येत आहेत कॉल

92, +82, +62 या कोड असलेले कॉल कोणत्या देशातून येत आहेत याबद्दल व्हाट्सअप ने माहिती दिली आहे की, मलेशिया, केनियात, व्हिएतनाम, इथियोपिया यांसारख्या देशांच्या ISD वरून हे कॉल येत आहे. या कॉल च्या मागे नेमकी सत्यता काय आहे हे अजून माहिती नसून या फोन कॉल मुळे फ्रॉड होण्याची शक्यता प्रचंड आहे. या कोड वरून आलेला कॉल आपण रिसिव्ह केल्यानंतर, समोरून कोणीही बोलत नाही, काही सेकंदाच्या आतच हा कॉल कट होतो. अशावेळी पुन्हा कॉल करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुम्ही तो नंबर ब्लॉक करू शकतात.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी वापरा Whatsapp चे सायलेंट फीचर

युजर्स ला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी AI आणि बाकीच्या टेक्नॉलॉजी चा वापर करून फेक अकाउंट शोधून ते ब्लॉक करत आहोत. मार्च महिन्यामध्ये अशा प्रकारचे 47 लाख अकाउंट बंद करण्यात आले आहे. असं व्हाट्सअप ने सांगितलं. यासोबतच कंपनीने अनोळखी कॉल ला सायलेंट करण्यासाठी व्हाट्सअमध्ये एक फिचर दिले आहे. या फिचरचा वापर करून आपण फ्रॉड कॉलिंग पासून वाचू शकतो.

या फिचरचा वापर करण्यासाठी फॉलो करा ही स्टेप

1) Whatsapp ओपन करा.
2) Whatsapp च्या सेटिंग मध्ये जा
3) त्यानंतर प्रायव्हसी या ऑप्शन वर क्लिक करा.
4) त्यानंतर तुम्हाला कॉल हा ऑप्शन दिसेल.
5) कॉल या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सायलेंट अननोन कॉल्स हे ऑप्शन दिसेल.
6) या ऑप्शन वर क्लिक करा. आणि त्या ठिकाणी दिलेल्या ऑन बटन वर क्लीक करा.