Whatsapp Channel मध्ये मिळणार नवं फीचर्स; या लोकांना होणार फायदा

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Whatsapp च्या माध्यमातून आज-काल  चॅटींग करण्याचा अनुभव अप्रतिम होत आहे. यासोबतच फक्त चॅटिंग नाही तर फोटो शेअरिंग, ऑडिओ व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप मेकिंग सर्व गोष्टी मजेशीर झाल्या आहेत. कारण कंपनी कडून वेगवेगळे फीचर्स Whatsapp मध्ये ऍड करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच Whatsapp मध्ये Whatsapp Channel फीचर हे लॉन्च करण्यात आले होते.  या फिचरच्या माध्यमातून इंस्टाग्राम प्रमाणेच व्हाट्सअँप वरदेखील आपल्याला आवडत्या एक्ट्रेस आणि राजकीय नेत्यांना फॉलो करता येते. आता या व्हाट्सअप चॅनलमध्ये कंपनीकडून आणखीन एक फीचर ऍड करण्यात येणार आहे. या नवीन फीचर च्या माध्यमातून व्हाट्सअप चॅनेल वापरणे मजेशीर होईल.

   

WABETAINFO वरून मिळाली माहिती

WABETAINFO या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार,Whatsapp Channel मध्ये नवीन फीचर ऍड करण्यात येणार आहे. हे नवीन फीचर्स चैनल क्रियेटर साठी उपलब्ध करण्यात येईल. आता व्हाट्सअप चॅनेल क्रियेटर्स ला  त्यांनी केलेल्या पोस्टवर मिळणाऱ्या व्ह्यूज ची संख्या दिसेल. म्हणजे ज्या व्यक्तीने  चैनल वर एखादी पोस्ट केली असेल, ती पोस्ट किती व्यक्तींनी पाहिले हे समजू शकेल. हे फीचर व्हाट्सअप ग्रुप चॅटिंग मध्ये उपलब्ध आहे. व्हाट्सअप ग्रुप चॅटिंग मध्ये  आपण सेंड केलेला मेसेज आतापर्यंत किती युजर्स ने पाहिला हे समजते. त्याच प्रकारे आता चॅनेल मध्ये देखील हे फीचर उपलब्ध होईल.

फीचरच्या माध्यमातून समजेल व्ह्यूज ची संख्या आणि कमेंट्स- Whatsapp Channel

Whatsapp Channel मध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या या नवीन फीचर च्या माध्यमातून  क्रियेटर्स ला  पोस्ट केलेल्या व्ह्यूज ची संख्या समजेल. एवढेच नाही तर आता पोस्ट वर आलेल्या कमेंट्स देखील  क्रिएटर्सला दिसतील. आतापर्यंत चैनल क्रियेटर्सला  त्यांच्या पोस्टवर आलेल्या कमेंट्स आणि व्ह्यूज दिसत नव्हत्या. परंतु आता या फिचरच्या माध्यमातून क्रियेटर्स ला सोप्या पद्धतीने व्ह्यूजची संख्या आणि कमेंट्स दिसेल.