Whatsapp Channels मधून तुमचा आवाजही पाठवता येणार; लवकरच मिळणार व्हॉइस मेसेजिंग फीचर

टाइम्स मराठी । मेटाचे स्वामित्व असलेले Whatsapp या सुप्रसिद्ध मेसेजिंग ॲप मध्ये कंपनीकडून वेगवेगळे बदल करण्यात येत आहे. मेटा कडून या Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट करण्यात येत असून हे फीचर्स युजर्स साठी अप्रतिम सुविधा उपलब्ध करत आहे. Whatsapp यापूर्वी फक्त इन्स्टंट मेसेजिंग ॲप होते परंतु आता व्हाट्सअप च्या माध्यमातून ऑफिशियल आणि प्रोफेशनल काम देखील करण्यात येत आहे. Whatsapp मध्ये बरेच फीचर उपलब्ध करण्यात आले आहे.  त्यातच आता Whatsapp आणखीन एक फीचर युजर साठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

   

WAbetainfo या वेबसाईटच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, Whatsapp मध्ये काही दिवसांपूर्वी उपलब्ध करण्यात आलेलया Whatsapp Channel या फीचर मध्ये बरेच नवीन फीचर्स रिलीज करण्यात येणार आहे. त्यापैकी एक फीचर म्हणजे व्होईस मेसेज असेल. या नवीन फीचर च्या माध्यमातून युजर व्हाट्सअप चैनल मध्ये फॉलोवर्सला व्हॉइस मेसेज क्रियेट करू शकतील. सध्या या व्हाट्सअप चैनल वर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ लिंक्स आणि फोटो सेंड केले जात आहे. आता लवकरच व्होईस मेसेज ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल.

त्याचबरोबर whatsapp मध्ये चॅनल क्रियेटर्सला व्हॉइस रेकॉर्ड हे ऑप्शन चॅट बॉक्स मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. हे व्हॉइस रेकॉर्ड ऑप्शन माईक या आयकॉन मध्ये उपलब्ध होईल. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर व्हॉइस रेकॉर्ड करता येऊ शकते. हे अप्रतिम फीचर लवकरच युजर साठी उपलब्ध करण्यात येणार आहे.