Whatsapp Channels : अरे व्वा!! आता Whatsapp वरून तुमच्या आवडत्या सेलिब्रेटींना फॉलो करा; लाँच झालं नवं फीचर्स

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँप वर (Whatsapp Channels) दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला Whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच व्हाट्सअप आता नवीन नवीन अपडेट युजर साठी उपलब्ध करून देत आहे. आता व्हाट्सअपने भारतासह 150 देशांमध्ये व्हाट्सअप चॅनेल्स लाँच केले आहेत. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीला फॉलो करू शकाल.

   

काय आहे हे फिचर (Whatsapp Channels)

व्हाट्सअपच हे नवीन अपडेटेड फीचर्स असून या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला ॲप मध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टीचा लाभ मिळेल. इंस्टाग्राम वर ज्याप्रमाणे आपण आपल्या आवडत्या ॲक्टर एक्ट्रेस ला (Celebrities) फॉलो करतो त्याचप्रकारे आता व्हाट्सअप वर देखील आपण आपल्या आवडीच्या ऍक्टर एक्ट्रेसला आणि संस्थांना फॉलो करू शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला या फिचरच्या माध्यमातून संस्थेसंबंधित अपडेट देखील मिळू शकता.

व्हाट्सअँप चॅनेल

व्हाट्सअप च्या या नवीन फिचर च्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही सेलिब्रेटी सोबत जोडले जाऊ शकतात. एवढेच नाही तर संस्था कंपन्यांना देखील तुम्ही फॉलो करू शकतात. व्हाट्सअपच्या या चॅनलच्या माध्यमातून कंपन्या देखील ग्राहकांसोबत जोडल्या जातील. या चॅनेलचा (Whatsapp Channels) वापर ब्रॉडकास्टिंग टूल्स म्हणून केला जाऊ शकतो. व्हाट्सअप चॅनेल सध्या खाजगी प्रसारण सेवा म्हणून डिझाईन करण्यात आले आहे. या चॅनेलवर फॉलोवर्स म्हणून तुमचा फोन नंबर आणि प्रोफाइल फोटो इतर फॉलोवर्सला दाखवला जाणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला कोणाला फॉलो करायचे आहे हे तुम्हाला निवडावे लागेल. त्याचबरोबर या चॅनलची हिस्ट्री फक्त 30 दिवसांसाठी सेव करण्यात येईल त्यानंतर हिस्ट्री आपोआप डिलीट होईल.

150 देशांमध्ये लॉन्च

याबाबत मेटाने सांगितले की, काही महिन्यांमध्ये कोणालाही चॅनल (Whatsapp Channels) तयार करण्याचा पर्याय आम्ही उपलब्ध करणार आहोत. जेणेकरून कोणीही चैनल ओपन करू शकेल. मेटाने यापूर्वी सिंगापूर आणि कोलंबिया मध्ये हे whatsapp चॅनेल लाँच केले होते. त्यानंतर हे चॅनेल इजिप्त, चिली, मलेशिया, मोरोक्को, युक्रेन, केनिया, पेरू या ठिकाणी लॉन्च करण्यात आले होते. आता हे चॅनल भारतासह 150 देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. सध्या तरी यामध्ये ऍडमिन मेसेज फोटोज आणि व्हिडिओ पोल पाठवू शकतील. त्यानंतर हे व्हाट्सअप चॅनल अपडेट करून नवीन फीचर्स देखील यामध्ये उपलब्ध करण्यात येतील.

मेटाने लॉन्च केलेले हे whatsapp चॅनेल काही आठवड्यांमध्ये जागतिक स्तरावर सुरू करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. मेटाच्या या नवीन फीचर मुळे तुम्ही वेगवेगळे चॅनल शोधू शकतात. या चॅनेलवर भारतासोबतच जगातील काही सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, कलाकार या चॅनलवर आधीपासूनच उपस्थित असणार आहे.

जर तुम्ही देखील या फीचर्सचा लाभ घेऊ इच्छित असाल तर ही प्रोसेस करा

1) गुगल प्ले स्टोअर वर जा.
2) तुमचे व्हाट्सअप अपडेट करा.
3) त्यानंतर तुम्ही व्हाट्सअप ओपन करा. व्हाट्सअप च्या स्क्रीन खाली तुम्हाला अपडेट्स टॅब मिळेल. त्यावर क्लिक करा.
4) यानंतर तुम्हाला काही चॅनल दिसतील. त्यापैकी कोणतेही चॅनल तुम्ही फॉलो करू शकतात.
5) फॉलो करण्यासाठी तुम्हाला चॅनल समोर दिलेल्या + या चिन्हावर क्लिक करावे लागेल.