WhatsApp Community Feature ‘या’ लोकांसाठी आहे अतिशय उपयुक्त

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या WhatsApp वर कंपनीकडून वेगवेगळे फीचर्स अपडेट करण्यात येत आहेत. WhatsApp पूर्वी फक्त मेसेजिंग ॲप होते परंतु आता या इन्स्टंट मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून ऑफिशियल प्रायव्हेट कामे करता येतात. त्याचबरोबर व्हाट्सअप हे युझर्स ची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी यावर जास्त लक्ष देते. WhatsApp वर उपलब्ध करण्यात आलेल्या फीचर्स च्या माध्यमातून चॅटिंग करणे आणखीन मजेशीर झाले आहे. व्हाट्सअप मध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्स पैकी एक म्हणजे व्हाट्सअप कम्युनिटी (WhatsApp Community Feature) . या फीचर बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

   

व्हाट्सअप कम्युनिटी हे फिचर सर्वसामान्य युजर साठी अप्रतिम आहे. आपल्याला जेव्हा फेस्टिवल सीजन मध्ये व्हाट्सअप मध्ये उपलब्ध असलेल्या  दहा पेक्षा जास्त व्यक्तींना मेसेजेस पाठवायचे असतात  तेव्हा या व्हाट्सअप कम्युनिटी फीचर्स चा वापर केला जाऊ शकतो. कारण या फीचर च्या माध्यमातून आपण  2000 लोकांसोबत चर्चा करू शकतो.  खास करून या फिचरचा वापर  बिझनेस करणाऱ्या व्यक्तींना आणि  एखाद्या नेत्याला मोठ्या प्रमाणात होतो.

काय आहे हे फीचर- WhatsApp Community Feature

व्हाट्सअप कम्युनिटी या फीचर्स साठी (WhatsApp Community Feature) सर्वात आधी कम्युनिटी ग्रुप तयार केला जातो. या ग्रुपच्या माध्यमातून  आपल्या संपर्कातील मधील व्यक्तींना जोडले जाते. आणि  व्हाट्सअप कम्युनिटी मध्ये एक स्पेशल ग्रुप तयार केला जातो. या ग्रुपमध्ये एखाद्या खास विषयावर चर्चा करता येऊ शकते. म्हणजेच  एखादा हेल्थ रिलेटेड कम्युनिटी ग्रुप तयार केल्यानंतर हेल्थ रिलेटेड सर्व गोष्टी या ग्रुपवर विचारले जाऊ शकतात. यासोबतच आपण  हेल्थ डॉक्टर किंवा या रिलेटेड व्यक्तीला देखील आपण या कम्युनिटी ग्रुप मध्ये ऍड करू शकतो. कम्युनिटी फीचर्सच्या माध्यमातून एकाच वेळी बऱ्याच लोकांसोबत आपण जोडले जाऊ शकतो. आणि या ग्रुपच्या माध्यमातून सर्व सदस्य वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे मत मांडू शकतात.

व्हाट्सअप वर उपलब्ध असलेले कम्युनिटी फीचर (WhatsApp Community Feature) हे कॉल्स आणि एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड असतात. म्हणजेच या चॅट मध्ये सहभागी असलेल्या युजर शिवाय कोणीही हे मेसेज वासू किंवा ऐकू शकत नाही. या व्हाट्सअप कम्युनिटी टीचर च्या माध्यमातून 100 किंवा त्यापेक्षा जास्त ग्रुप बनवता येतात. तुम्ही देखील WhatsApp वर उपलब्ध असलेल्या या कम्युनिटी फीचर्स वापर करू इच्छित असाल तर खालील पद्धतीने टिप्स फॉलो करा.

अशा पद्धतीने बनवा कम्युनिटी ग्रुप

1) सर्वात आधी व्हाट्सअप अकाउंट ओपन करा.
2) त्यानंतर कम्युनिटी टॅब दिसेल. यावर क्लिक करा.
3) त्यानंतर न्यू कम्युनिटी टॅब वर क्लिक करा.
4) त्यानंतर तुम्ही तुमच्या कम्युनिटीला एक नाव देऊ शकतात.
5) शिवाय तुम्ही विषयाचे नाव देखील देऊ शकतात.
6) त्यानंतर तुम्ही कम्युनिटी फोटो या ग्रुपला ॲड करू शकतात.
7) त्यानंतर तुम्ही कम्युनिटी मध्ये तुम्हाला हवे ते युजर्स जोडू शकतात.