Whatsapp वरील Detete For Everyone मेसेज पहायचेत? फक्त ‘ही’ Trick वापरा

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Whatsapp वर दोन मिलियनपेक्षा जास्त ऍक्टिव्ह युजर सध्या आहेत. Whatsapp च्या माध्यमातून आपण ऑफिशियल,पर्सनल कामे करत असतो. त्यातच बऱ्याचदा काही महत्त्वाची चॅट करत असताना समोरच्या व्यक्तीकडून Detete For Everyone म्हणजेच मेसेज डिलीट केला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीने नेमका काय मेसेज आपल्याला केला होता हे आपल्याला समजत नाही. कारण Detete For Everyone म्हणजे दोघांच्याही मोबाईल मधून तो मेसेज डिलीट करण्यात आलेला असतो. मात्र आता आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही डिलीट केलेले मेसेज सुद्धा पाहू शकाल.

   

तुम्ही एका ट्रिकच्या मदतीने समोरच्या व्यक्तीने डिलीट फॉर एव्हरीवन केलेला मेसेज पाहू शकतात. यासाठी कोणतेही फीचर किंवा सर्विस उपलब्ध नसून तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच अवघ्या काही मिनिटात आणि सोप्या ट्रिकच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीने डिलीट केलेला मेसेज पाहू शकतात. त्यासाठी आम्ही खाली काही स्टेप्स दिल्या आहेत त्या फॉलो करा.

1) आधी तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जा.
2) त्यानंतर नोटिफिकेशन अँड स्टेटस बार हे ऑप्शन दिसेल.
3) नोटिफिकेशन अँड स्टेटस बार या ऑप्शन वर क्लिक करा.
4) या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर More Setting मध्ये जा.
5) More Setting मध्ये गेल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री दिसेल.
6) त्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप नोटिफिकेशन दिसेल.
7) व्हाट्सअप नोटिफिकेशन ला ऑन केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन बार वरच व्हाट्सअप ओपन न करता तुम्हाला कोणत्या व्यक्तीने मेसेज केला आहे तो दिसेल.