WhatsApp आणतय नवं फीचर्स!! ग्रुप चॅट मॅनेज करणं होणार सोप्प

टाइम्स मराठी । जगातील करोडो युजर्स WhatsApp चा वापर करत आहेत. मेटा कंपनीकडून WhatsApp मध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे WhatsApp वापरणे आणखीनच मजेशीर झाले आहे. कंपनीने यामध्ये ऍड केलेले फीचर्स युजरचे वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. एवढेच नाही तर या फीचर्स मुळे  WhatsApp हे फक्त मेसेंजर नाही तर इन्स्टंट मेसेंजर बनले आहे. या व्हाट्सअप च्या माध्यमातून फक्त चॅट नाही तर बिजनेस, ऑफिशियल, पर्सनल कामे देखील करता येतात. काही दिवसांपूर्वी WhatsApp नवीन कम्युनिटी ग्रुप हे फीचर उपलब्ध केले होते. आता या कम्युनिटी ग्रुप साठी आणखीन दोन फीचर लॉन्च करण्यात येणार आहे.

   

WABETAINFO यांनी दिलेल्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, ज्याप्रमाणे WhatsApp चे नॉर्मल चॅट आपण अर्चिव Archive करतो, त्याचप्रकारे आता कम्युनिटी ग्रुप देखील Archive करता येणार आहे. एवढेच नाही तर कम्युनिटी ग्रुप चॅट्स ला पिन देखील करण्याचे ऑप्शन देण्यात येणार आहे. या दोन्ही ऑप्शनमुळे व्हाट्सअप वर कम्युनिटी ग्रुपला प्रायव्हसी मिळेल. यापूर्वी WhatsApp कम्युनिटी ग्रुप साठी हे दोन्ही फिचर उपलब्ध नव्हते. आता या फीचर्स वर काम सुरू आहे.

पिन फिचर्स

WhatsApp मध्ये युजर्सला महत्त्वाचे चॅट पिन करण्याची सुविधा मिळते. जेणेकरून आवश्यक असेल तेव्हा ती चॅट शोधण्यासाठी वेळ जाणार नाही. आणि WhatsApp ओपन केल्यावर सदर व्यक्तीचे चॅट सर्वात वर दिसेल . यासाठी पिन हे फीचर्स उपलब्ध आहे. हेच फीचर आता कम्युनिटी ग्रुप साठी देखील उपलब्ध करण्यात येणार आहे.

Archive फोल्डर

बऱ्याचदा WhatsApp युजर्स ला काही चॅट्स लपवण्यासाठी काही ऑप्शन गरजेचे असतात. त्यानुसार WhatsApp मध्ये अर्चिव्ह Archive चॅट हे एक ऑप्शन आहे. चॅट अर्चिव्ह केल्यामुळे सर्व साधारण चॅट पेक्षा वेगळ्या फोल्डरमध्ये तुम्हाला हे चॅट दिसते. हे फीचर कम्युनिटी  ग्रुपसाठी लॉन्च करण्यात आल्यावर  अर्चीव्ह फोल्डरमध्ये तुम्ही कम्युनिटी चॅट देखील ऍड करू शकता.