Whatsapp चे नवं फीचर्स!! नव्याने ग्रुपमध्ये Add झालेला मेंबर जुने मेसेजही पाहू शकणार

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँप (Whatsapp ) सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. मागच्या महिन्यामध्ये व्हाट्सअप ने वेगवेगळे फीचर्स लॉन्च केले. या व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मेसेज , पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग, व्हिडिओ मेसेज, एचडी फोटो शेअरिंग, यासारखे वेगवेगळे फिचर लॉन्च झाल्यानंतर आपण बरेच काम या माध्यमातून करू शकतो. यासोबतच व्हाट्सअप ने आणखीन एक नवीन फिचर यूजर साठी लॉन्च करण्यात येणार आहे.

   

काय असेल हे नवीन फिचर

Whatsapp रिसेन्ट हिस्टरी शेअरिंग नावाचं एक नवीन फिचर लवकरच लॉन्च करणार आहे. या फीचर च्या माध्यमातून एखाद्या ग्रुप मध्ये नवीन ऍड झालेल्या मेंबरला जुने मेसेज वाचण्याची सुविधा उपलब्ध होईल. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला ॲड करतात तेव्हा ग्रुप मध्ये सुरुवातीला झालेली चॅटिंग नवीन ऍड करण्यात आलेल्या युजर्सला दिसत नाही. त्यामुळे सुरुवातीला करण्यात आलेली चॅट नेमकी काय होती हे समजणे आणि टॉपिक समजणे अवघड जाते. यावर उपाय म्हणून व्हाट्सअप नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या फीचर च्या माध्यमातून नवीन ग्रुप मेंबर ला जुने मेसेज वाचण्याची सुविधा उपलब्ध होईल.परंतु या फीचर चे पूर्ण कंट्रोल ग्रुप ॲडमिन कडे असेल.

सध्या विटा टेस्टरसाठी उपलब्ध

जर नवीन ग्रुप मेंबरला जुने मेसेज वाचायचे असल्यास ग्रुप ॲडमिन हे फिचर सक्षम करू शकते. त्यासाठी सर्व ग्रुप मेंबरला एक सूचना जारी करण्यात येईल. आणि नवीन मेंबर्स आल्यानंतर 24 तासांची चॅट पाहण्याची परवानगी दिली जाईल. याबाबत व्हाट्सअपच्या डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्टेड असलेल्या Webetainfo या वेबसाईटने शेअर केली आहे. या नवीन फिचर नुसार नवीन मेंबर्सला ग्रुप मध्ये करण्यात आलेली चॅट, किंवा टॉपिक समजण्यासाठी मदत होईल. यासोबतच त्यांना या चार्टमध्ये सहभागी होण्याचा देखील चान्स मिळेल. सध्या हे फीचर बीटा टेस्टर साठी उपलब्ध असून येणाऱ्या काळात सर्व युजर साठी लॉन्च करण्यात येऊ शकते.

व्हाट्सअप लाँच करणार आणखीन एक नवीन फिचर

Whatsapp ने बीटा युजर्स साठी आणखीन एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. या फीचर चे नाव मल्टी अकाउंट लॉगिन असून या फीचर च्या माध्यमातून युजर्स एकाच मोबाईल नंबर ने अनेक व्हाट्सअप अकाउंट ओपन करू शकतात. या फीचरमुळे त्यांच्या गप्पा आणि वैयक्तिक अकाउंट कोणत्याही अडचणी शिवाय मॅनेज करता येऊ शकतात. या फीचरच्या माध्यमातून नवीन अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला फक्त दोन अकाउंट स्विच करणे गरजेचे आहे. म्हणजेच पुन्हा पुन्हा लॉगिन करण्याची चिंता मिटेल. ही फीचर लवकरच सर्व युजरसाठी आणण्यात येणार आहे