Whatsapp ने आणलं दमदार फीचर्स; आता HD क्वालिटीमध्ये पाठवा Photo

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच Whatsapp आता नवीन नवीन अपडेट युजर साठी उपलब्ध करून देत आहे. असंच एक अपडेट आता व्हाट्सअप ने आणलेलं आहे. या नवीन अपडेट्स किंवा फीचर्सच्या मदतीने फोटो शेअरिंग करणे आणखीनच खास बनले आहे.

   

काय आहे हे फीचर

Whatsapp ने फोटो शेअरिंग सुधारण्यासाठी नवीन फिचर लॉन्च केले आहे. या फिचर च्या माध्यमातून तुम्ही HD फोटो आता शेअर करू शकता. बऱ्याचदा आपल्याला फोटो कॉम्प्रेस करून शेअर करावा लागतो. यामुळे फोटोची क्वालिटी खराब होते, आणि कॉम्प्रेस केलेला फोटो शेअर केल्यावर फोटो ब्लर देखील दिसायला लागतो. या सर्व गोष्टींपासून सुटका मिळवण्यासाठी व्हाट्सअप ने हे नवीन फिचर लॉन्च केले आहे. सध्या हे फिचर फेज मैनेर या ठिकाणी लॉन्च करण्यात आले असून लवकरच भारतात देखील लॉन्च होईल. या फिचरची माहिती मेटा चे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चैनल च्या माध्यमातून दिली आहे.

अशा पद्धतीने काम करेल हे फीचर

Whatsapp ने आणलेले हे नवीन फिचर वापरण्यासाठी तुम्हाला फोटो शेअर करत असताना HD हे ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल. याशिवाय जर तुम्ही फोटो पाठवत असाल तर तुम्हाला तो कॉम्प्रेस करावाच लागेल. परंतु एचडी या ऑप्शनमुळे कॉम्प्रेस न करता पाठवू शकता. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला एचडी फोटो पाठवाल तेव्हा समोरच्या व्यक्तीला चित्राच्या माध्यमातून एचडी फोटोची माहिती मिळेल. कारण या फोटोच्या खाली एचडी लोगो देण्यात येईल. व्हाट्सअप कडून एचडी फोटो फीचर नंतर एचडी व्हिडिओ हे ऑप्शन देखील देण्यात येणार आहे.

Whatsapp च्या माध्यमातून तुम्ही अशा पद्धतीने शेअर करू शकतात HD फोटो.

1) व्हाट्सअप ओपन करा.
2) त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला HD फोटो पाठवायचा आहे त्या व्यक्तीच्या अकाउंट वर जा.
3) यानंतर मेसेज बार वर प्लस या ऑप्शनवर क्लिक करा.
4) यानंतर तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ लायब्ररी ऑप्शन दिसेल.
5) या ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला पाठवायची असलेली इमेज निवडा.
6) इमेज निवडल्यानंतर तुम्हाला एचडी हा ऑप्शन दिसेल.
7) या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही एचडी फोटो सेंड करू शकतात.