24 ऑक्टोंबरपासून ‘या’ Mobile मधील Whatsapp पडणार बंद

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. परंतु आता पुढच्या महिन्यापासून काही युजर्सला Whatsapp वापरण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण काही स्मार्टफोनवर पुढच्या महिन्यापासून Whatsapp बंद करण्यात येणार आहे.

   

सध्या Whatsapp हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अँड्रॉइड फोनवर काम करते. ज्या स्मार्टफोनचे अँड्रॉइड व्हर्जन 4.1 आहे अशा वर्जनवरच Whatsapp सध्या सुरू आहे. परंतु आता 24 ऑक्टोंबर पासून व्हाट्सअप फक्त अँड्रॉइड 5.0 या नवीन व्हर्जन वाल्या स्मार्टफोनवरच काम करणार आहे. त्याचबरोबर Iphone वापरणाऱ्यांमध्ये देखील ios 12 किंवा त्याच्यापेक्षा वरील वर्जन मध्येच Whatsapp काम करेल. ios 12 च्या खालील कोणत्याही Iphone मध्ये आता Whatsapp चालणार नाही

24 ऑक्टोबर पासून फक्त Whatsapp नाही तर बरेच एप्लीकेशन जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणार नाही. याशिवाय नवीन सेक्युरिटी अपडेट शिवाय तुमचा स्मार्टफोन राहणार नाही आणि सायबर गुन्हे देखील यामुळे वाढतील. जर तुमचा स्मार्टफोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो हे तुम्हाला माहीत नसेल तर खालील पद्धतीने तुम्ही जाणून घेऊ शकतात.

1) सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जा.
2) सेटिंग मध्ये गेल्यानंतर About phone हाऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
3) यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर डिटेल्सवर क्लिक करावे लागेल.
4) सॉफ्टवेअर डिटेल्स मध्ये गेल्यावर अँड्रॉइड व्हर्जन या कॅटेगिरीच्या खाली तुम्हाला तुमचा स्मार्टफोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो हे समजेल.

कोणकोणत्या मोबाईल वरील Whatsapp बंद होणार?

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जन 4.1 किंवा त्यापेक्षा जुन्या OS वर्जन वर स्मार्टफोन चालणार नाही. यामध्ये Sony Xperia Z, LG Optimus G Pro, Samsung Galaxy S2, Samsung Galaxy Nexus, HTC Sensation, Motorola Droid Razr, Sony Xperia S2, Motorola Xoom, Samsung Galaxy Tab 10.1, Asus Eee Pad Transformer, Acer Iconia Tab A5003, Samsung Galaxy S, HTC Desire HD, LG Optimus 2X, Sony Ericsson Xperia Arc3, Nexus 7 (upgradable to Android 4.2), Samsung Galaxy Note 2, HTC ONE या स्मार्टफोनचा समावेश आहे.