Whatsapp ने लॉन्च केले नवं फीचर; सायबर क्राईम्स वाढण्याची शक्यता

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Whatsapp मध्ये  मेटा कडून वेगवेगळे फीचर्स अपडेट केले जात आहे. या फीचर्स च्या माध्यमातून Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर झाले आहे. त्याचबरोबर Whatsapp मध्ये आणखीन फीचर्स उपलब्ध करण्यात येणार आहे. Whatsapp च्या माध्यमातून चॅटिंग सोबतच, व्हिडिओ कॉलिंग ऑडिओ कॉलिंग प्रायव्हेट वर्क ऑफिशियल वर्क करता येतात. Whatsapp वर उपलब्ध करण्यात येणाऱ्या फीचर्स सोबतच कंपनी युजरच्या सिक्युरिटी आणि प्रायव्हसी साठी देखील वेगवेगळे अपडेट्स उपलब्ध करत असते. त्यानुसार आता व्हाट्सअप ने आणखीन एक फीचर लॉन्च केले आहे. परंत्तू या फीचर्स मुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे.

   

आजकाल सर्व काम हे ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सायबर क्राईम म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेला क्राईम. हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे आदेश आणि नियम  जारी करण्यात येत आहे. त्यानुसार व्हाट्सअपने आता  नवीन फीचर लॉन्च केले आहे. या फीचरला protect IP address in call असं म्हणण्यात येत आहे.

काय आहे हे फीचर

जेव्हा आपण Whatsapp च्या माध्यमातून ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करतो. तेव्हा IP address मिळत असतो. या IP Adress  च्या माध्यमातून  पोलीस आणि सरकार ट्रॅक करू शकतात. परंतु Whatsapp ने लॉन्च केलेल्या protect IP address in call या फीचरमुळे व्हाट्सअप कॉलिंग वेळी IP Adress  हिडन करण्यात येतो. ज्यामुळे कॉल करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅक करता येत नाही.

हे फीचर योग्य आहे की अयोग्य

Whatsapp ने लॉन्च केलेल्या या फीचरमुळे सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. कारण युजर्स ला सायबर गुन्हेगाराकडून आलेला फोन पोलिसांना किंवा सरकारला ट्रॅक करता येणार नाही. यापूर्वी Whatsapp वर आलेल्या कॉलच्या IP Adress  च्या माध्यमातून पोलिसांना गुन्हेगार शोधण्यामध्ये मदत होत होती. परंतु आता IP Adress  शोधण्यासाठी पोलिसांना Whatsapp कडून मदत घ्यावी लागेल. पण यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

काय आहे IP address

IP address हा युजरच्या मोबाईल नेटवर्क म्हणजे होस्ट आणि इंटरनेट यामधील १२ अंकांचा युनिक ऍड्रेस म्हणजे डिजिटल पत्ता असतो. या डिजिटल पत्त्याचा वापर डिवाइस आणि कम्युनिकेशन साठी केला जातो. या IP address च्या माध्यमातून युजरच्या नेटवर्क प्रोव्हायडर पासून ते कॉल केलेल्या व्यक्तींच्या ऍड्रेस पर्यंत पोहोचण्यास मदत होते.