Skip to content
Times Marathi
  • News
  • Business
  • Gadgets
  • Automobile
  • Astrology
  • Trending
Times Marathi
  • News
  • Business
  • Gadgets
  • Automobile
  • Astrology
  • Trending

Whatsapp सुरु करण्यासाठी नंबरची गरज नाही; Mail ID च्या माध्यमातून करा लॉगिन

नोव्हेंबर 23, 2023नोव्हेंबर 22, 2023 by Vijaya Solanke
Whatsapp Log In Gmail

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेंजर ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Whatsapp वर बरेच अपडेट आणि फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता मजेशीर झाले असून, ऑफिशियल,पर्सनल कामे देखील व्हाट्सअप च्या माध्यमातून केली जातात. Whatsapp मध्ये उपलब्ध करण्यात आलेले फीचर्स वापरताना अप्रतिम अनुभव मिळतो. Whatsapp मध्ये व्हिडिओ कॉलिंग, ऑडिओ कॉलिंग, चॅनेल फीचर, HD फोटो क्वालिटी  यासारखे बरेच फीचर्स  कंपनीने उपलब्ध केले आहे. आता कंपनीने iOS व्हाट्सअप युजर साठी व्हाट्सअप अकाउंट ओपन करण्यासाठी E- mail आयडी लिंक करण्याची अनुमती दिली आहे.

   

काय आहे हे फीचर

Whatsapp ईमेल ऍड्रेस व्हेरिफिकेशन फीचर च्या माध्यमातून युजर्सला व्हाट्सअप अकाउंट ओपन करण्यासाठी मोबाईल नंबरची गरज पडणार नाही. कारण आता ईमेल आयडीच्या माध्यमातून  व्हाट्सअप अकाउंट ओपन करणे सोपे होईल. त्यासाठी युजर्स ला व्हाट्सअप जीमेल अकाउंटला व्हेरिफाय करावे लागेल. सध्या तरी कंपनीकडून हे फीचर iOS युजर साठी उपलब्ध करण्यात आले आहे. लवकरच हे फीचर अँड्रॉइड युजर साठी उपलब्ध होईल. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सअप लॉगिन साठी प्राइमरी मेथड फक्त मोबाईल नंबर असेल. ई-मेल ऍड्रेस व्हेरिफिकेशन हे फीचर कमी सेल्युलर नेटवर्क क्षेत्रात राहणाऱ्या युजर साठी  अप्रतिम ऑप्शन आहे.

अशा पद्धतीने करा WhatsApp Email Verification

या फीचर च्या माध्यमातून मोबाईल नंबर शिवाय व्हाट्सअप अकाउंट ओपन करता येईल. म्हणजे व्हाट्सअप साठी आता मोबाईल नंबरची गरज भासणार नाही. व्हाट्सअप लॉगिन करण्यासाठी तुम्हाला जीमेल अकाउंट व्हेरिफाय करावे लागेल. तुम्ही देखील या फिचरचा वापर करू इच्छित असाल तर, सर्वात आधी व्हाट्सअप  सेटिंग मध्ये जा. त्यानंतर अकाउंट वर जाऊन जीमेल ऍड्रेस वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला  ईमेलवर 6 अंकी कोड मिळेल. या कोडच्या माध्यमातून तुम्ही ईमेल व्हेरिफिकेशन करू शकतात.

Categories Trending, News, Technology Tags Latest Marathi News, Marathi News, WhatsApp, Whatsapp Feature, Whatsapp Login
New Toyota Hilux Hybrid लॉन्च; मिळतात हे खास फीचर्स
घरामध्ये चांदीच्या हत्तीची मूर्ती ठेवल्याने मिळते सुख समृद्धी; पहा अजून काय फायदे होतात
  • About Us
  • Contact Us
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
© 2025 TimesMarathi. Times Marathi News (www.timesmarathi.news) is an independent news and information website. We are not affiliated, associated, authorized, endorsed by, or in any way officially connected with the Times Media Group, or any of its subsidiaries or its affiliates.