Whatsapp Message Edit : आता Whatsapp वरील मेसेज करा Edit; ‘या’ स्टेप्स फॉलो करा

टाइम्स मराठी । (Whatsapp Message Edit) जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण Whatsapp द्वारे करू शकतो. Whatsapp फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच व्हाट्सअप आता नवीन नवीन अपडेट युजर साठी उपलब्ध करून देत आहे. या नवीन अपडेट्स किंवा फीचर्सच्या मदतीने तुम्ही टायपिंगच्या चुका सुधारू शकतात. आणि एकदा पाठवलेला मेसेज एडिट करू शकता.

   

काय आहे हे फीचर– (Whatsapp Message Edit)

काही दिवसांपूर्वी व्हाट्सएप्प व्हिडिओ मेसेजची सुविधा उपलब्ध केली होती. त्यानंतर आता व्हाट्सअपने युजर साठी मेसेज एडिट करण्यासाठी स्पेशल फीचर लॉन्च केले आहे. या फीचरनुसार आपण एखादा व्यक्तीला मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत टायपिंग मिस्टेक सुधरू शकतो. आणि मेसेज एडिट करू शकतो. हे फीचर्स अँड्रॉइड आयओएस आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. जर तुम्हाला हे फीचर वापरायचे असेल तर तुम्हाला व्हाट्सअप चे अपडेटेड व्हर्जन इन्स्टॉल करावे लागेल.

अशा पद्धतीने मेसेज एडिट करा-

1) तुमचं व्हाट्सअप ओपन करा.
2) त्यानंतर कोणत्याही चॅट ऑप्शन मध्ये जा.
3) तुम्हाला जो मेसेज एडिट (Whatsapp Message Edit) करायचा असेल त्यावर लॉन्ग प्रेस करा.
4) यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट वर क्लिक करा.
5) त्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन देण्यात येतील.
6) या तीन ऑप्शन पैकी एक म्हणजे इन्फो, दुसरा कॉपी, तिसरा म्हणजे एडिट.
7) यानुसार एडिट ऑप्शन वर क्लिक करा.
8) त्यानंतर तुमचा मेसेज एडिट होऊ शकतो. परंतु हा ऑप्शन मेसेज सेंड केल्याच्या 15 मिनिटांपर्यंत देण्यात येईल.