टाइम्स मराठी । जगात प्रसिद्ध असलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या व्हाट्सअँप वर (Whatsapp) वेगवेगळ्या प्रकारचे नवीन अपडेट्स येत असतात. जगात व्हाट्सअप वर 2 मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये 500 मिलियन पेक्षाही जास्त लोक व्हाट्सअप वापरतात. या सोशल मीडिया ॲपमुळे कनेक्टिव्हिटी जोडून राहते. आता व्हाट्सअप ने आणखीन एक नवीन फिचर्स यूजर साठी आणलेला आहे. बरेचदा झेरॉक्स काढण्यासाठी किंवा अनोळखी व्यक्तीला व्हाट्सअप द्वारे काही डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी आपल्याला व्हाट्सअप मध्ये त्या व्यक्तीचा नंबर सेव्ह करावा लागतो. त्यानंतर आपण त्या व्यक्तीला डॉक्युमेंट पाठवू शकतो किंवा चॅट करू शकतो. परंतु आता व्हाट्सअप ने आणलेल्या नवीन फीचर्स मुळे आता मोबाईल नंबर सेव्ह न करता आपल्याला चॅटिंग करता येणार आहे.
Whatsapp ने आणलेले नवीन फिचर हे अँड्रॉइड आणि आयओएस यूजर साठी उपलब्ध आहे. यापूर्वी एखाद्या अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवायचा असल्यास तो मोबाईल नंबर अगोदर सेव्ह करावा लागत होता. परंतु आता सोप्या पद्धतीने मोबाईल नंबर सेव न करता चॅट करण्याची अनुमती व्हाट्सअप ने दिलेली आहे. त्यामुळे उगीच कोणाचाही नंबर सेव करण्याची गरज आपल्याला भासणार नाही आणि आपला वेळही वाचेल.
असा करा वापर – (Whatsapp)
१) व्हाट्सअप च्या या नवीन फिचरचा वापर करण्यासाठी सर्वात अगोदर व्हाट्सअप ओपन करा.
२) त्यानंतर न्यू चॅट ऑप्शनवर क्लिक करा. आणि सर्च मध्ये तुम्हाला चॅट करायचा असलेला अनोळखी नंबर टाका. किंवा तुम्ही कॉपी पेस्ट देखील करू शकता.
३) सर्च केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट सह लोडिंग आयकॉन दिसेल. आयकॉन Looking outside your contact या टेक्स्ट फॉरमॅट मध्ये असेल.
४) जर तुम्ही कॉपी पेस्ट केलेला नंबर बरोबर असेल तर तुम्हाला त्या नंबरशी जोडलेले नाव आणि चॅट ऑप्शन दिसतील.
या चार्ट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही त्या व्यक्तीसोबत चॅट करू शकतात.
५) जर तुमच्या मोबाईल मध्ये हे फिचर उपलब्ध नसेल तर प्ले स्टोअर वर जाऊन व्हाट्सअप अपडेट करा.
लॅपटॉप आणि मोबाईल साठी आता व्हाट्सअप ने (Whatsapp) आणखीन एक नवीन फिचर अपडेट केले आहे. हे फीचर बीटा टेस्टर साठी असून फोन नंबर च्या माध्यमातून आता लॅपटॉप वर लॉगिन करता येऊ शकते. यापूर्वी लॅपटॉप मध्ये व्हाट्सअप लॉगिन करण्यासाठी मोबाईल वरून क्यूआर कोड स्कॅन करावा लागत होता. त्यानंतर तुम्ही व्हाट्सअप लॉगिन करू शकत होते. परंतु आत्ताच्या नवीन फिचर मुळे तुम्हाला व्हाट्सअप स्कॅन न करता, मोबाईल नंबर द्वारे लॅपटॉप मध्ये व्हाट्सअप सुरू करता येणार आहे.
१) लॅपटॉप मध्ये व्हाट्सअप सुरू करण्यासाठी फिचर डिस्प्ले च्या वर असलेले थ्री डॉट वर क्लिक करा.
२) त्यानंतर लिंक डिवाइस वर जा.
३) त्यानंतर तुम्हाला क्यू आर कोड स्कॅनर आणि त्याखाली Link with phone number instread हे ऑप्शन मिळेल.
४) यावर क्लिक करून तुम्ही लॅपटॉप मध्ये व्हाट्सअप सुरू करू शकाल.