Whatsapp ने आणलं नवं फीचर्स; चॅटिंग करताना येणार आणखी मजा

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Whatsapp वर जगभरातून लाखो करोडो यूजर सक्रिय असतात. Whatsapp यापूर्वी फक्त मेसेंजर होते. या मेसेंजरच्या माध्यमातून फक्त चॅट केलं जात होते. परंतु आता मेटा कंपनीने Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड केल्यानंतर व्हाट्सअप च्या माध्यमातून ऑफिशियल पर्सनल कामे केली जातात. एवढेच नाही तर  Whatsapp मध्ये मेटाने व्हिडिओ ऑडिओ कॉलिंग, HD फोटो शेअरिंग, व्हाट्सअप चैनल, कम्युनिटी ग्रुप, यासारखे बरेच फीचर्स ॲड केले आहे. जेणेकरून व्हाट्सअप वापरताना मजेशीर अनुभव मिळतो. यासोबतच मेटाकडून बऱ्याच फीचर वर सध्या काम सुरू आहे. आता कंपनीने नवीन फीचर लॉन्च केले आहे. या फीचरच्या माध्यमातून  व्हाट्सअप चा आणखीनच चांगला अनुभव मिळेल.

   

काय आहे फीचर

Whatsapp ने हे फीचर रोलआउट करण्याबाबत मायक्रो ब्लोगिंग प्लॅटफॉर्म  ट्विटर म्हणजेच X वर घोषणा केली. Whatsapp च्या या नवीन फीचरचे नाव व्हॉइस चॅट फीचर आहे. या फीचर च्या माध्यमातून यूजर्स ते 33 ते 128 ग्रुप मध्ये कनेक्ट होऊ शकतात. यासोबतच फीचरच्या माध्यमातून युजर्स ग्रुप मेंबर सोबत लाईव्ह कनेक्ट होऊ शकतात. आणि व्हॉइस चॅटिंग वेळेस मेसेज देखील करू शकतात. सध्या हे फीचर बीटा व्हर्जन वर उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर सर्व युजरसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळेल व्हॉइस चॅटची माहिती

व्हाट्सअपच्या व्हॉइस चॅट फीचरच्या माध्यमातून युजर्सला चॅटिंग करताना मजेशीर अनुभव मिळेल. जेव्हा तुम्ही मोठ्या ग्रुप मध्ये चॅट करत असाल तेव्हा  या फिचरचा जास्त वापर होऊ शकतो. तुम्हाला देखील हे फीचर वापरायचे असेल तर  तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरून whatsapp चे नवीन फिचर अपडेट करू शकतात.  जेव्हा एखाद्या ग्रुप मध्ये व्हॉइस चॅट सुरू असेल तेव्हा ग्रुप मधील मेंबर्सला ग्रुप कॉल बटनच्या ऐवजी व्हॉइस चॅट सुरू करण्याचे ऑप्शन मिळेल. या ग्रुप व्हॉइस  चॅट मध्ये सहभागी होण्यासाठी किंवा व्हॉइस चॅट सुरू झाल्यानंतर ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी ग्रुप मेंबरला नोटिफिकेशन येईल.

व्हॉइस चॅट मध्ये जोडल्या गेलेल्या मेंबरची संख्या समजेल

या ग्रुप मध्ये सुरू असलेल्या व्हॉइस चॅट च्या माध्यमातून किती मेंबर जोडले गेले आहेत हे देखील समजेल. जेव्हा ग्रुप मधील सर्व मेंबर्स व्हॉइस चॅट लिव्ह करतील तेव्हाच ही व्हॉइस चॅट संपेल. याशिवाय 60 मिनिट किंवा 1 तासापर्यंत कोणतेही ग्रुप मेंबर जोडले गेले नाही तर व्हॉइस चॅट ओव्हर होईल. ज्या व्यक्तींना ग्रुप व्हॉइस चॅट मध्ये इंटरेस्ट नाही अशा व्यक्तींना या फीचर च्या माध्यमातून कोणतीच अडचण होणार नाही.