आता Status पाहण्यासाठी Profile मध्ये जाण्याची गरज नाही; Whatsapp मध्ये आले आणखीन एक नवीन फिचर 

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल बरेच युजर सक्रिय असतात. यामध्ये Facebook, Whatsapp, Instagram यासारख्या बऱ्याच मीडिया प्लॅटफॉर्मचा  वापर होतो. त्यापैकी Whatsapp वर जगातील लाखो करोडो युजर सक्रिय आहेत. Whatsappमध्ये मेटा कंपनीने बरेच फीचर्स उपलब्ध केल्यामुळे आता Whatsapp च्या माध्यमातून बरेच पर्सनल ऑफिशियल काम केले जातात. काही महिन्यांपासून मेटा कंपनीने या Whatsapp मध्ये बरेच फीचर्स उपलब्ध केले आहे. या फीचर्सच्या माध्यमातून युजर्सला  अप्रतिम अनुभव मिळतो. आता कंपनीने अजून एक फीचर्स आणलं आहे. त्याबाबत जाणून घेऊया..

   

काय आहे हे फीचर

Whatsapp या इन्स्टंट मेसेंजर मध्ये स्टेटस साठी स्पेशल अपडेट उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार आता स्टेटस पाहण्यासाठी युजर्स ला प्रोफाईलवर टॅप करण्याची गरज नाही. कारण आता चॅट मध्येच युजरने लिहिलेल्या मजकुराचे स्टेटस पाहता येईल. चॅट बॉक्स मध्ये ज्याप्रकारे आपल्याला युजर चा डीपी आणि नाव दिसते त्याचप्रकारे आता स्टेटस देखील दिसेल.  या फीचर बाबत  WABETAINFO या वेबसाईटने माहिती उपलब्ध केली आहे. 

अँड्रॉइड युजर साठी उपलब्ध करण्यात येत आहे फीचर

जेव्हा तुम्ही Whatsapp वर ऑफलाईन असाल तेव्हा लास्ट सिन आणि युजर चे स्टेटस तुम्हाला अल्टरनेट दिसून येईल. यासोबतच तुम्ही व्हाट्सअप सेटिंग मध्ये जाऊन हे बदल करू शकतात. या फिचर मुळे युजर्सला  प्रोफाइल वर टॅप न करता मजकुरातील स्टेटस पाहता येईल. हे नवीन फीचर सर्व अँड्रॉइड युजर साठी उपलब्ध करण्यात येत आहे.