Whatsapp घेऊन येतंय नवीन फीचर्स; मेसेज करणं आणखी होणार मजेशीर

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण Whatsapp द्वारे करू शकतो. मागच्या महिन्यामध्ये व्हाट्सअप ने वेगवेगळे फीचर्स लॉन्च केले. या फिचर च्या माध्यमातून व्हाट्सअप वापरणे आता आणखीनच मजेशीर झाले आहे. या व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मेसेज , पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग, व्हिडिओ मेसेज, एचडी फोटो शेअरिंग, यासारखे वेगवेगळे फिचर लॉन्च झाल्यानंतर आपण बरेच काम या माध्यमातून करू शकतो. या सोबतच व्हाट्सअप ने आणखीन काही नवीन फिचर यूजर साठी आणणार असल्याची घोषणा केली आहे.

   

काय आहे हे फिचर

सध्या Whatsapp नवीन फिचर वर काम करत असून लवकरच लॉन्च होणारे हे फिचर खास करून सॉफ्टवेअर डेव्हलपर्स प्रोग्रामर कोडर यांच्यासाठी असेल. व्हाट्सअप च्या नवीन अपडेट मध्ये तीन नवीन फॉरमॅटिंग टूल देखील देण्यात येणार आहे. हे टूल आयओएस आणि अँड्रॉइड साठी देखील जारी करण्यात येतील. या नवीन टूल्स च्या माध्यमातून कोडला व्हाट्सअँप वर वाचण्यास आणि समजण्यासाठी सोपे होईल. हे फिचर व्हाट्सअँप डेस्कटॉपच्या बीटा व्हर्जन वर दाखवण्यात आले आहे.

ही आहे खासीयत

WABetaInfo यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या Whatsapp तीन नवीन टेक्स्ट फॉरमॅटिंग टूलवर काम करत आहे. हे टूल कोड ब्लॉक या नावाने लॉन्च करण्यात येणार आहे. व्हाट्सअप चे हे नवीन फिचर लॉन्च झाल्यानंतर एखाद्या वाक्यामधील खास शब्द सिलेक्ट करून आपण त्यावर रिप्लाय देऊ शकतो. त्याचबरोबर या टूल च्या माध्यमातून युजर्स कोणताही मेसेज मध्ये एखाद्या आयटमची पूर्ण लिस्ट देखील तयार करू शकतात. म्हणजेच एखाद्या मेसेज मध्ये •item 1 •item 2 या प्रकारे लिस्ट तयार करता येऊ शकते.