Whatsapp चे नवं फीचर्स; आता ग्रुप बनवताना नाव टाकण्याची गरज नाही

टाईम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्समुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. मागच्या महिन्यामध्ये व्हाट्सअप ने वेगवेगळे फीचर्स लॉन्च केले. या व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मेसेज , पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग, व्हिडिओ मेसेज, एचडी फोटो शेअरिंग, यासारखे वेगवेगळे फिचर लॉन्च झाल्यानंतर आपण बरेच काम या माध्यमातून करू शकतो. या सोबतच व्हाट्सअपने आणखीन एक नवीन फिचर यूजर साठी आणणार असल्याची घोषणा केली आहे.या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही विना नावाशिवाय ग्रुप बनवू शकता.

   

नुकताच मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट करून या फीचर ची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, यूजर्स आता विना नावाचा Whatsapp ग्रुप बनवू शकतात. म्हणजेच आता व्हाट्सअप ग्रुप बनवताना युजर्सला नाव सर्च करण्याची किंवा एखादे नाव सुचवण्याची गरज भासणार नाही. म्हणजे व्हाट्सअप स्वतःहून व्हाट्सअप ग्रुप चे नाव ठरवेल. समजा दोन व्हाट्सअप युजर्स आहे त्यांचे नाव टिनू आणि मिनू आहे. यावरून व्हाट्सअप ग्रुपचे नाव झाले टिनू अँड मिनू. म्हणजेच यूजर च्या नावावरून व्हाट्सअप ग्रुपचे ऑटोमॅटिकली नाव फिक्स करेल.

या नवीन फीचर्स च्या माध्यमातून Whatsapp ने युजरच्या प्रायव्हसीचा जास्त विचार केला आहे. यानुसार व्हाट्सअप च्या या फिचर मध्ये प्रत्येक ग्रुप मेम्बर्सला या ग्रुपचं नाव वेगवेगळे दिसेल. याशिवाय जर तुमच्या ग्रुपमध्ये असलेल्या काही मेंबर्सला तुम्ही ओळखत नाही किंवा त्यांच्याकडे तुमचा मोबाईल नंबर सेव नसेल तर ग्रुप मधील सर्व मेंबर्स ला तुमचा मोबाईल नंबर दिसणार नाही. तुम्ही ग्रुप मेंबर असाल तरी देखील त्यांना तुमचा नंबर दिसू शकणार नाही. यामुळे तुमचा नंबर अनोळखी व्यक्तींकडे जाऊ शकणार नाही.