Whatsapp वर होणार सर्वात मोठा बदल; आता Chat Window मध्येच दिसणार तुमची प्रोफाइल

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेंजर ॲप म्हणून लोकप्रिय झालेल्या Whatsapp चे जगभरात लाखो युजर्स आहेत. Whatsapp या ॲपच्या माध्यमातून फक्त कॉलिंग आणि चॅटिंग नाही तर ऑफिशियल पर्सनल कामे देखील करता येतात. META कंपनीने Whatsapp मध्ये गेल्या काही महिन्यापासून बरेच फीचर्स उपलब्ध केले आहे. या फीचर्स च्या माध्यमातून व्हाट्सअप वापरणे आणखीनच मजेशीर झाले आहे. आता Whatsapp मध्ये एक अशा फीचर वर काम सुरू आहे, ज्याच्या माध्यमातून  युजरच्या प्रोफाईल मध्ये उपलब्ध असलेली माहिती चॅट विंडो मध्ये देखील दिसेल. जाणून घेऊया काय आहे फीचर.

   

काय आहे हे फीचर

Whatsapp मध्ये एखाद्या अनोळखी व्यक्तीचा मेसेज आल्यास आपण या अनोळखी व्यक्तीच्या चॅट इन्फो पेजवर जातो. या पेजवर गेल्यानंतर आपल्याला प्रोफाइल फोटो पासून नाव, स्टेटस यासारख्या बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते. परंतु आता या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी  चॅट इन्फो पेजवर जाण्याची गरज नाही. कारण व्हाट्सअप मध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या नवीन फीचर्स च्या माध्यमातून युजर्स ची माहिती चॅट इन्फो पेज ओपन न करता चॅट विंडो ओपन केल्यावर सर्वात वर दिसेल. याबाबत WABETAINFO या वेबसाईटच्या माध्यमातून नवीन फिचर बद्दल माहिती मिळाली आहे.

सर्व युजर साठी करण्यात येईल उपलब्ध

या नवीन फीचर च्या माध्यमातून  यूजर चे नाव स्टेटस प्रोफाइल इन्फॉर्मेशन ही पूर्णपणे चॅट विंडोवर दिसेल. जेणेकरून युजर्स  आलेल्या अनोळखी मेसेजला रिप्लाय द्यायचा की नाही हे ठरवू शकतील. कंपनीकडून हे फीचर व्हाट्सअप चॅनेल मध्ये देखील टेस्टिंग करण्यात येत आहे. लवकरच हे फीचर सर्व युजर साठी उपलब्ध करण्यात येणार असून त्यासाठी कोणतीही स्टेप फॉलो करण्याची गरज नाही.