Whatsapp घेऊन येतंय Secret Code फीचर; आता चॅटिंग होणार आणखी सुरक्षित

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून व्हाट्सअँप मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे व्हाट्सअँप वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. यासोबतच आता व्हाट्सअप मध्ये आणखीन फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. आता व्हाट्सअप लवकरच युजर साठी नवीन Secret Code फीचर लॉन्च करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजरच्या सिक्युरिटीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जाईल.

   

मिळालेल्या माहितीनुसार, मेटा Whatsapp मध्ये लॉक चॅट सह Secret Code फीचर डेव्हलप करत आहे. सध्या आपल्या Whatsapp मध्ये व्हेरिफिकेशन कोडने लॉक केलेली चॅट वेगळ्या सेक्शनमध्ये दिसते. परंतु हे नवीन फीचर लॉन्च केल्यानंतर लॉक चॅटसाठी नवीन सेक्शन उपलब्ध केले जातील. किंवा सेक्शन साठी वेगळे ऑप्शन उपलब्ध केले जातील. Whatsapp च्या या अपकमिंग फीचरवर काम सुरू आहे. लवकरच हे देखील फीचर सुरुवातीला बीटा टेस्टर साठी उपलब्ध करण्यात येईल. त्यानंतर अन्य युजरसाठी खुले करण्यात येईल.

आणखीन एक फीचर येणार

यासोबतच मेटा Whatsapp मध्ये आणखीन एक फीचर लॉन्च करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सला लॉक चॅट फोल्डरसाठी कस्टमर पासवर्ड सेट करावा लागेल. हे फीचर युजरसाठी अत्यंत लाभदायी असेल. या फीचरमुळे लॉक चॅट जास्त सिक्युअर करण्यात येणार आहे. सध्या व्हाट्सअप वेगवेगळ्या फीचर्स वर काम करत असून लवकरच युजरसाठी हे फीचर कंपनीकडून लॉन्च करण्यात येणार आहे. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर Whatsapp वापरण्यामध्ये बरेच बदल होतील. याशिवाय Whatsapp देखील आता आपल्याला नवीन रूपात दिसू शकते.