आता 2 आठवडे ठेवता येणार Whatsapp Status; कंपनी लाँच करणार खास फीचर्स

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. यासोबतच आता व्हाट्सअप मध्ये आणखीन फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानुसार आता काही दिवसांतच तुम्हाला तुमचा Whatsapp Status २ आठवडे ठेवता येणार आहे. सध्या तुम्ही स्टेटसला ठेवलेले फोटोज किंवा व्हिडिओ १ दिवस म्हणजे 24 तासांसाठी ऍक्टिव्ह असतात.

   

Whatsapp वर चॅटिंग सोबतच स्टेटस च्या माध्यमातून काही स्पेशल मोमेंट शेअर केले जातात. हे स्टेटस 24 तासांसाठी ठेवण्यात येतात. त्यानंतर ते आपोपाप गायब होतात. परंतु आता कंपनी 24 तासांची लिमिट आणखीन वाढवू शकते. सध्या या फिचर वर कंपनीकडून काम सुरू असून 24 तासांऐवजी आता २ आठवडे आपले स्टेटस लाईव्ह ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. म्हणजेच  आपण ठेवलेले स्टेटस आपल्या कॉन्टॅक्ट मधील युजर्स पूर्णपणे दोन आठवडे पाहू शकतात.

Whatsapp Status साठी मिळतील 4 ऑप्शन

Whatsapp च्या बीटा व्हर्जन  2.23.20.12 या अपडेट नंतर  स्टेटस सेक्शन मध्ये बरेच नवीन फीचर कंपनी लॉन्च करणार आहे.  या फीचर्सच्या माध्यमातून युजर्सला स्टेटस अपडेट साठी चार ऑप्शन दिसतील. त्यानुसार आपले स्टेटस किती वेळ लाईव्ह ठेवायचे हे युजर्सच्या हातात असेल. या चार ऑप्शन पैकी  एक आठवडा, दोन आठवडे, 24 तास, तीन दिवस हे ऑप्शन देण्यात येतील.

दरम्यान, Whatsapp च्या अँड्रॉइड व्हर्जनवर चॅट इंटरफेसला पुन्हा डिझाईन करण्याचे काम कंपनीकडून सुरू आहे. यामध्ये Whatsapp चा कलर डिझाईन सर्व पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. यासारखे बरेच फीचर आता कंपनी युजर्स साठी उपलब्ध करणार असून Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होणार आहे. आणखीन बरेच बदल व्हाट्सअप मध्ये होणार आहे.