Whatsapp वरील Status मिनिटात करा Download; फक्त ‘ही’ Trick वापरा

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Whatsapp हे सर्वाधिक पसंतीचे अँप आहे. व्हाट्सअप चे जगभरात मोठ्या प्रमाणात यूजर्स असून या माध्यमातून आपण चॅटिंग करणे, फोटो आणि विडिओ पाठवणे, एकमेकांचे मोबाईल नंबर सेंड करणे अशा अनेक सुविधांचा लाभ घेतो. Whatsapp वर Status ठेवणं हे सुद्धा सर्वांच्या आवडीचे फीचर्स आहे. जवळपास सर्वजण आपल्या Whatsapp अकाउंट वर स्टेट्स ठेवतात आणि आपल्या भावना एकाच वेळी सर्व लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात.

   

काही वेळा आपल्या मित्राने किंवा नातेवाईकाने ठेवलेला स्टेटस आपल्याला आवडतो आणि आपणही ठेवावा असं आपल्याला वाटत. जर फोटो असेल तर स्क्रिन शॉट काढून आपण ठेऊ शकतो, परंतु विडिओ असेल तर आपल्याला सदर व्यक्तीला मेसेज करून मला तो विडिओ पाठवा असं सांगावं लागत आणि त्या व्यक्तीने व्हिडिओ सेंड केल्यानंतरच आपण तो ठेऊ शकतो. परंतु मित्रांशी संपर्क न करता त्याचा स्टेटस डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी Status Saver हे अँप मोबाईल मध्ये घ्यावं लागेल. या अँपच्या माध्यमातून एखाद्याचा व्हाट्सअँप स्टेटस कसा डाउनलोड करायचा हे आपण जाणून घेऊया

१) सर्वप्रथम गुगल Play Store वरून WhatsApp साठी Status Saver डाउनलोड करा.
२) डाउनलोड केल्यानंतर अॅप उघडा आणि नंतर स्टोरेजमध्ये प्रवेश करण्याची परवानगी द्या.
३) WhatsApp स्टेटस सेव्ह किंवा डाउनलोड करण्यासाठी, मेसेजिंग अॅपमध्ये स्टेटस पहा.
४) यानंतर फोनवर स्टेटस सेव्हर अॅप ओपन करा.
५) तुम्ही WhatsApp वर पाहिलेले सर्व स्टेटस येथे तुम्हाला दिसतील.
6) यानंतर, येथून तुम्ही स्टेटस सेव्हरवरून तुम्हाला हवा असलेला स्टेटस डाउनलोड करू शकाल.