टाइम्स मराठी । Whatsapp या इन्स्टंट मेसेंजर ॲप्लिकेशनचे संपूर्ण जगात 2.7 बिलियन पेक्षा जास्त युजर्स आहे. Whatsapp च्या माध्यमातून आता फक्त चॅटिंग नाही तर ऑफिशियल पर्सनल वर्क, HD व्हिडिओ फोटो शेअरिंग, ऑडिओ शेअरिंग, ग्रुप मेकिंग यासारखे बरेच कामे करता येतात. एवढेच नाही तर बिझनेस आणि पेमेंट देखील Whatsapp च्या माध्यमातून करता येते. मेटा कंपनीने Whatsapp मध्ये बरेच फीचर्स उपलब्ध केले असून हे फीचर्स अप्रतिम अनुभव देतात. व्हाट्सअप कडून सतत युजर्सच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटी कडे लक्ष दिले जाते. परंतु आता व्हाट्सअप युजरसाठी वाईट बातमी आहे. कारण आता व्हाट्सअप युजर्सला चॅट बॅकअपसाठी गुगल ड्राईव्ह (Google Drive) वरअनलिमिटेड स्टोरेज मिळणार नाही.
काय आहे हे फीचर
Whatsapp मध्ये बॅकअप साठी पॉप्युलर फीचर्स देण्यात आले होते. कारण या फिचरच्या माध्यमातून Whatsapp Chat Backup घेण्यास मदत होत होती. बरेच युजर्स बॅकअप घेऊन गुगल ड्राईव्ह मध्ये डेटा सिक्युअर करत होते. परंतु आता बॅकअप घेता येणार नाही. गुगलकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सअप वर लवकरच नवीन बदल करण्यात येणार आहे. या बदलानुसार अँड्रॉइड व्हाट्सअप युजर्स ला गुगल ड्राईव्हवर अनलिमिटेड चार्ट हिस्ट्री सेव करता येणार नाही. गुगल ड्राईव्ह वरील स्पेस भरल्यानंतर युजर्स ला google कडून क्लाऊड स्टोरेज खरेदी करावे लागेल.
15 GB पेक्षा जास्त स्टोरेजसाठी मोजावे लागेल पैसे
अँड्रॉइड स्मार्टफोन युजर साठी Whatsapp वर बॅकअप फीचर मिळणार आहे. परंतु तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये 15 GB स्टोरेज उपलब्ध असेल तर तुम्ही बॅकअप घेऊ शकाल. जर google ड्राईव्ह मध्ये 15 GB स्टोरेज फुल भरले असेल तर तुम्हाला पैसे भरून स्टोरेज खरेदी करावे लागेल. किंवा तुम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये सेव असलेल्या जुन्या फाईल क्लियर करून स्टोरेज मिळवू शकता.