टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर वेगवेगळ्या प्रकारचे नवीन अपडेट्स येत असतात. जगात व्हाट्सअप वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये 500 मिलियन पेक्षाही जास्त लोक व्हाट्सअप वापरतात. या सोशल मीडिया ॲपमुळे कनेक्टिव्हिटी जोडून राहते. त्याचप्रकारे आता युजरला जास्तीत जास्त लोकांशी जोडण्यासाठी आता एक खास अपडेट आलेलं आहे. या अपडेट मुळे आता तुम्ही एकाच वेळी १५ जणांना Video Call करू शकता
एकावेळी 15 जणांना करा Video Call – Whatsapp
व्हाट्सअप वरून आपण आतापर्यंत 4 किंवा 5 जणांना व्हिडिओ कॉल वर ऍड करू शकत होतो. परंतु आता नवीन फिचर्सच्या माध्यमातून व्हाट्सअप युजर्स एका कॉलिंग मध्ये 15 जणांना जॉईन करू शकतात आणि याचा फायदा घेऊ शकतात. म्हणजे आता प्रत्येकाला कॉलिंग करण्यापेक्षा एकदाच 15 जणांना कनेक्ट करून तुम्ही बोलू शकता. हे फीचर्स अजून तरी सर्वांसाठी उपलब्ध केलेले नसून फक्त अँड्रॉइड युजर साठी उपलब्ध करण्यात आले आहे.
यापूर्वी व्हाट्सअँप द्वारे तुम्ही फक्त 7 जणांना कनेक्ट करू शकत होता . 2022 ला एप्रिलमध्ये हे फिचर्स जारी करण्यात आले होते. त्यावेळी जास्तीत जास्त 32 जणांसोबत कनेक्ट करू शकाल असं सांगण्यात आलं होतं. परंतु आता व्हाट्सअँप वरून 15 जण एक साथ कनेक्ट करता येऊ शकतात. याशिवाय आता Whatsapp मध्ये अजुन एक फिचर ऍड करण्यात आले आहे. या फिचर्स च्या माध्यमातून तुम्ही एनीमेटेड अवतार तयार करू शकतात. आणि Whatsapp चॅटिंग मध्ये देखील त्याचा वापर करू शकता. हा एनीमेटेड अवतार तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे तयार करून ड्रेसिंग, हेअरस्टाईल सह चेंज करू शकतात.