Whatsapp Video Message : आता Whatsapp वरून पाठवू शकता व्हिडिओ मेसेज; चॅटिंगचा आनंद दुप्पट होणार

Whatsapp Video Message । जगभरातील प्रसिद्ध मेसेजिंग ऐप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हाट्सअप मध्ये आता नवीन फिचर आले आहे. आतापर्यंत तुम्ही व्हाट्सअप वरून टेक्स्ट मेसेज, ऑडिओ क्लिप मेसेज पाठवलं असाल पण आता व्हाट्सअप च्या या नवीन फिचर मुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ मेसेज सुद्धा पाठवता येणार आहे. व्हाट्सअपने या फीचर्सबद्दल घोषणा केली. आणि शेवटी आता हे फीचर लॉन्च करण्यात आलं आहे. या फिचर्स च्या माध्यमातून युजर्स आता 60 सेकंदाचे व्हिडिओज मेसेज पाठवू शकतात. यापूर्वी ऑडिओ मेसेज ज्या पद्धतीने पाठवता येत होता त्याच प्रकारे हा व्हिडिओ मेसेज देखील पाठवण्यात येणार आहे. यासाठी व्हिडिओ मेसेजचा वेगळा आयकॉन व्हाट्सअप उपलब्ध करून देणार आहे.

   

असा करा वापर – (Whatsapp Video Message)

तुम्हाला देखील या फीचर्सचा वापर करायचा असेल तर सर्वात अगोदर व्हाट्सअप अपडेट करा. त्यानंतर चॅट उघडून खाली येणाऱ्या ऑडिओ मेसेज आयकॉन वर एकदा टॅप करा. आतापर्यंत ऑडिओ मेसेज आयकॉन वर टॅप केल्यावर लॉंग क्लिक करून ठेवल्यावर ऑडिओ रेकॉर्ड होत होता. परंतु आता तुम्ही ऑडिओ मेसेजवर एकदाच टॅप केल्यानंतर तुम्हाला ऑडिओ मेसेज चा आयकॉन दिसेल. ज्याप्रकारे ऑडिओ मेसेज तुम्ही क्लिक करून पाठवत होतात त्याच प्रकारे आत व्हिडिओ मेसेज देखील लॉन्ग टॅप करून ठेवून पाठवू शकता.

तुम्ही हा व्हिडिओ क्लिप ज्या व्यक्तींना पाठवणार आहे त्या व्यक्तीला पूर्वी म्यूट मध्ये व्हिडिओ दिसेल. स्क्रीनवर टॅप केल्यानंतर ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही दिसेल. व्हाट्सअप च्या बाकीच्या मेसेज प्रमाणे या फिचरला देखील एन्ड टू एंड इंक्रीप्शन ची सुविधा मिळणार आहे. Whatsapp च्या Whatsapp Video Message फीचर्स मुळे आता चॅटिंगचा आनंदही दुप्पट होणार आहे.

यापूर्वी देखील Whatsapp चे बरेच फीचर्स लॉन्च करण्यात आले होते.

एकाच वेळी 15 जणांना व्हिडिओ कॉलिंग

व्हाट्सअप वरून आपण आतापर्यंत 4 किंवा 5 जणांना व्हिडिओ कॉल वर ऍड करू शकत होतो. परंतु आता नवीन फिचर्सच्या माध्यमातून व्हाट्सअप युजर्स एका कॉलिंग मध्ये 15 जणांना जॉईन करता येते.

नंबर सेव न करता चॅटिंग

व्हाट्सअपने आणलेले नवीन फिचर हे अँड्रॉइड आणि आयओएस यूजर साठी उपलब्ध आहे. यापूर्वी एखाद्या अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवायचा असल्यास तो मोबाईल नंबर अगोदर सेव्ह करावा लागत होता. परंतु आता सोप्या पद्धतीने मोबाईल नंबर सेव न करता चॅट करण्याची अनुमती व्हाट्सअप ने दिलेली आहे.

व्हाट्सअप लॅपटॉप वर लॉग इन करण्यासाठी नंबर टाका

लॅपटॉप आणि मोबाईल साठी आता व्हाट्सअप ने आणखीन एक नवीन फिचर अपडेट केले होते. हे फीचर बीटा टेस्टर साठी असून फोन नंबर च्या माध्यमातून आता लॅपटॉप वर लॉगिन करता येऊ शकते. यापूर्वी लॅपटॉप मध्ये व्हाट्सअप लॉगिन करण्यासाठी मोबाईल वरून क्यूआर कोड स्कॅन करावा लागत होता. त्यानंतर तुम्ही व्हाट्सअप लॉगिन करू शकत होते. परंतु आत्ताच्या नवीन फिचर मुळे तुम्हाला व्हाट्सअप स्कॅन न करता, मोबाईल नंबर द्वारे लॅपटॉप मध्ये व्हाट्सअप सुरू करता येणार आहे.