Whatsapp वर आता Typing करण्याची झंझट संपणार; लवकरच येतंय नवीन फीचर्स

टाइम्स मराठी | जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्समुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणताही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच आता व्हाट्सअप आता नवीन अपडेट आपल्या युजरसाठी उपलब्ध करून देत आहे. या नवीन फीचर्सच्या मदतीने आता युजर्सला मेसेज टाईप करण्याची गरज भासणार नाही. तर voice चॅट द्वारे मेसेज टाईप होणार आहे. कसे ते जाणून घेऊया….

   

व्हाट्सअप्पने व्हॉइस ग्रुप कॉल फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सला मेसेज टाईप करण्याची गरज नसणार आहे. यामध्ये चॅट आणि व्हाट्सअप ग्रुप कनेक्ट करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. ज्या व्यक्तींना ऐकण्याचा किंवा दिसण्याचा त्रास आहे अशा लोकांसाठी हे फिचर फायदेशीर ठरू शकेल. यामध्ये लोक तुमच्या आवाजामध्ये तुमचं चॅट एक्सेस करू शकतील. व्हाट्सअप वर व्हॉइस चॅटिंग ही सुविधा पूर्वीपासून देण्यात आलेली आहे. परंतु ग्रुप व्हॉइस चॅटिंग फिचर हे यापेक्षाही वेगळं आहे.

IANS यांनी दिलेल्या माहितीनुसार मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअप यावर ग्रुप चॅटिंगसाठी नवीन व्हॉइस चॅट फीचर लॉन्च करण्यात आले असून हे फीचर्स सर्वात अगोदर अँड्रॉइड युजर साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अँड्रॉइड नंतर ते ios यूजर साठी दिले जाईल. त्याचबरोबर हे फीचर ट्विटर स्पेस सारखे असेल. ट्विटर स्पेस मध्ये कोणीही तुम्हाला जॉईन होऊ शकतं. म्हणजेच कोणताही यूजर ग्रुप व्हॉइस कॉलिंग मध्ये सहभागी होऊ शकते. पण हे एक खाजगी चॅट प्लॅटफॉर्म असेल. यामुळे या ग्रुपमधील मोजकेच लोक व्हॉइस चॅटचा भाग बनू शकतील.

व्हाट्सअप ने आणलेले हे नवीन फिचर चर्चेचे नवीन मंच बनू शकते. यामध्ये व्हाट्सअप ग्रुप चॅटचा ऑप्शन देण्यात येणार असून युजर्स याच्याशी कनेक्ट होऊ शकतात. जे यूजर्स कोणताही व्हाट्सअप ग्रुप वर व्हॉइस ग्रुप कॉल करतील त्याच व्हाट्सअप युजर्सला कनेक्ट करण्याचा ऑप्शन देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर तेच युजर्स स्वतःला व्हाट्सअप ग्रुप कॉल मध्ये कनेक्ट देखील करू शकतील. जर तुम्हाला या चॅटिंग मध्ये मज्जा येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला लिव्ह करण्याचा ऑप्शन देखील देण्यात येणार आहे.