Whatsapp चे रंग- रूप बदलणार; कंपनी लवकरच लॉन्च करणार नवीन अपडेट

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल प्रत्येक जण सक्रिय असतात. त्यातच Whatsapp या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चॅटिंग नाही तर ऑफिशियल पर्सनल कामे देखील करता येतात. आज-काल व्हाट्सअप च्या माध्यमातून एचडी फोटोज शेअरिंग, व्हिडिओ ऑडिओ कनेक्टिव्हिटी, चॅटिंग, ग्रुप, व्हॉइस कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग, व्हिडिओ मेसेज ऑडिओ मेसेज, यासारखे बरेच काम आपण करू शकतो. एवढेच नाही तर डॉक्युमेंट शेअरिंग देखील व्हाट्सअप च्या माध्यमातून केली जाते.

   

Whatsapp यूजर साठी प्रत्येक वेळेस नवीन नवीन फिचर्स आणि अपडेट कंपनीकडून उपलब्ध करण्यात येतात. त्यानुसार व्हाट्सअप आता लवकरच नवीन अपडेट लॉन्च करणार आहे. या नवीन अपडेट च्या माध्यमातून व्हाट्सअप आपल्याला पूर्णपणे बदललेले दिसेल. म्हणजेच व्हाट्सअप आता आपल्याला ग्रीन कलर मध्ये नाही तर वेगळ्या कलर मध्ये दिसेल. कारण व्हाट्सअँप लवकरच प्लॅटफॉर्म मॉडीफाय करणार आहे. जेणेकरून नवीन रंगांमध्ये आपण व्हाट्सअप वापरू शकतो.

याबाबत वोबेटाईफो या वेबसाईटने स्क्रीनशॉट शेअर करत माहिती दिली. त्याचबरोबर आता व्हाट्सअप UI मध्ये बदलणार आहे. त्याचबरोबर नेवीगेशन बारमध्ये देखील बदल करण्यात येणार आहे. म्हणजेच चॅट, स्टेटस, यासारख्या वेगवेगळ्या टाईपची देखील प्लेसमेंट करण्यात येईल. आणि नवीन कम्युनिटी टॅब मध्ये देखील बदल होईल.

Whatsapp चा कलर बदलण्यात येणार असून डार्क ऐवजी लाईट ग्रीन करण्यात येईल अशी शक्यता आहे. यासोबतच मेसेज बटन देखील बदलण्यात येऊ शकते. याशिवाय कंपनी Whatsapp मध्ये काही फिल्टर्स देखील उपलब्ध करू शकते. यामुळे तुम्हाला ऑल, अनरीड, पर्सनल आणि बिझनेस असे ऑप्शन मिळतील.