आता WhatsApp वरून समजेल तुमचा PNR स्टेटस; फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

टाइम्स मराठी । आज काल प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशन झालेलं दिसत आहे. त्याचप्रमाणे आता रेल्वे देखील डिजिटल झाल्याचं दिसत आहे. भारतीय रेल्वेने प्रवास करणे प्रत्येकाला आवडतं. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने तिकीट बुकिंग मॅनेजमेंट करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाच्या निर्णयानुसार सुखरूप प्रवासासाठी आता प्रवाशांना ट्रेनचे आरक्षण आणि PNR नंबर लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी आता WhatsApp च्या माध्यमातून तुम्हाला याबाबत माहिती मिळू शकते. म्हणजेच तुम्हाला तुमचे IRCTC PNR स्टेटस डायरेक्ट व्हाट्सअप वर दिसेल. त्यासाठी तुम्हाला व्हाट्सअप मध्ये एक नंबर सेव्ह करावा लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला खालील प्रोसेस करावी लागेल.

   

अशा पद्धतीने Whatsapp वर जाणून घ्या PNR डिटेल्स

1) सर्वात आधी IRCTC चा 9881198000 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा.
2) या नंबर वर Whatsapp वर तुमचा PNR नंबर टाका.
3) त्यानंतर तुम्हाला IRCTC कडून ऑटोमॅटिक रिप्लाय मिळेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या ट्रेनची वेळ, तिकिटाची माहिती यासारखी सर्व माहिती मिळेल.
4) यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ही माहिती जपून ठेवू शकतात. 

जर तुम्हाला IRCTC कडून PNR स्टेटस बद्दल अपडेट हवे असेल तर तुम्ही IRCTC सोबत चॅट सुरू ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा PNR नंबर पुन्हा टाकावा लागेल. आणि तुम्हाला तुमची ट्रेन कुठे आहे हे समजेल. तुम्ही ट्रेनमध्ये असल्यावर देखील तुम्ही IRCTC च्या माध्यमातून ट्रेन कुठे आहे आणि लोकेशन देखील समजेल. त्यानुसार तुमचा प्रवास देखील सुखरूप होऊ शकतो.