आता नंबर सेव्ह नसला तरी WhatsApp कॉल करता येणार; लाँच होणार भन्नाट फिचर

टाइम्स मराठी । संपूर्ण जगातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणाऱ्या WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहे. आपल्या वापरकर्त्यांना व्हाट्सअपचा अनुभव चांगला यावा आणि व्हाट्सअप वापरणे सोप्प जावं यासाठी कंपनी सतत नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स लाँच करत असते. आताही कंपनी अशाच एका फिचरवर काम करत आहे त्यामाध्यमातून एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर सेव्ह न करताही तुम्ही त्याला व्हाट्सअप वरून कॉल करू शकता. लवकरच हे फीचर्स यूजर्ससाठी रोल आऊट करण्यात येणार आहे.

   

सध्या जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला व्हाट्सअप वरून कॉल करायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी सदर व्यक्तीचा मोबाईल नंबर सेवा करावा लागतो, त्यानंतरच आपण व्हाट्सअप कॉल करू शकतो. परंतु आता व्हाट्सअपच्या या नव्या फिचर नुसार, तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी थेट ॲपवरून नंबर डायल करू शकाल. तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला डायलर पॅडवर नंबर डायल करुन जसा कॉल करता, तसेच हे फीचर व्हॉट्सॲपवर काम करेल. त्यासाठी नंबर सेव्ह करण्याची गरज नसेल.

व्हॉट्सॲपवर नंबर डायल करण्याचे हे फिचर सध्या डेव्हलप केले जात आहे आणि भविष्यातील काही अपडेटसह आणले जाईल. पण, व्हॉट्सॲपने अद्याप याबाबत संपूर्ण माहिती दिलेली नाही. हे फीचर आल्यावर व्हॉट्सॲप फक्त एक मॅसेजिंग प्लॅटफॉर्म राहणार नाही. तर एक मल्टि फंक्शनल कॉलिंग सेवा देणारे ॲप सुद्धा ठरणार आहे. व्हॉट्सॲपमध्ये हे डायलर फीचर सुरू झाल्यानंतर सामान्य कॉलवर जास्त अवलंबून राहण्याची गरज नाही. जेव्हा एखादा रेगुलर कॉल लागत नसेल तर यूजर्स व्हाट्सअँप कॉल करून संपर्क साधू शकतात आणि तुम्हाला नंबर सेवा करत बसण्याची गरज लागणार नाही.