Whatsapp : आता इंटरनेट नसलं तरी Whatsapp चालणार; फक्त ‘ही’ Trick वापरा

टाइम्स मराठी । मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेले व्हाट्सअँप (Whatsapp) हे करोडो लोक वापरतात. जगात या व्हाट्सअप वर 2 मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. भारतामध्ये 500 मिलियन पेक्षाही जास्त लोक व्हाट्सअप वापरतात. या सोशल मीडिया ॲपमुळे कनेक्टिव्हिटी जोडून राहते. या व्हाट्सअप वर चॅटींग व्हिडिओ कॉलिंग व्हिडिओ शेअरिंग देखील केले जाते. परंतु या सर्वांसाठी आणि व्हाट्सअप वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. इंटरनेट शिवाय आपण व्हाट्सअप वापरू शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल परंतु आपण इंटरनेट शिवाय देखील व्हाट्सअप वापरू शकतो. यासाठी काही ट्रिक्स आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

   

काय करावं लागेल ? (Whatsapp)

इंटरनेट शिवाय व्हाट्सअप (Whatsapp) वापरण्यासाठी आपल्याला कोणत्याही थर्ड पार्टी अँपची आवश्यकता नसून आपण वेब व्हाट्सअप च्या मदतीने ही ट्रिक्स वापरू शकतो. मल्टी डिवाइस सपोर्ट सह व्हाट्सअप लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वर कनेक्ट केल्यावर आपण इंटरनेट शिवाय व्हाट्सअप वापरू शकतो. हे एक मल्टी डिवाइस फिचर असून कोणत्याही सिच्युएशन मध्ये आपण व्हाट्सअप विना इंटरनेट वापरू शकतो.

नुकताच व्हाट्सअप ने (Whatsapp) नवीन फीचर्स अपडेट केले आहेत. या फीचर्स चा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचे व्हाट्सअप अपडेट करावे लागेल. त्याचबरोबर आता व्हाट्सअप ने एक शानदार फिचर लॉन्च केलं आहे. या फीचर च्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचा नंबर उगाच सेव्ह करायची गरज नाही. तुम्ही विना नंबर सेव्ह करता देखील व्हाट्सअप वरून चॅट करू शकतात. त्याचबरोबर लॅपटॉप आणि डेस्कटॉप साठी आता क्यू आर कोड स्कॅन न करता मोबाईल नंबर वर व्हाट्सअप लॉगिन करता येणार आहे.