मंगळ ग्रहावर माणूस नेमका उतरणार तरी कुठे? शास्त्रज्ञांनी शेअर केला जागेचा नकाशा

टाइम्स मराठी । मंगळ ग्रहासंदर्भात (Mars Planet) आपण बऱ्याचदा वेगवेगळे रहस्य ऐकत असतो. त्याचबरोबर असे काही रहस्य आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. त्यातच जगभरातील वैज्ञानिक मंगळ ग्रहावर वेगवेगळ्या मिशनच्या माध्यमातून रिसर्च करत असतात. आता मंगळ ग्रहावर मानवी वस्ती डेव्हलप करण्याचे स्वप्न लवकरच साकारले जाईल. यासाठी नासाकडून संशोधन सुरू आहे. मंगळ ग्रहावर ऑक्सिजन निर्मिती करण्यामध्ये नासाला आता यश आले आहे. त्यामुळे आता मानवी वस्ती निर्माण करण्याच्या अनुषंगाने नासाकडून (NASA) प्रयत्न सुरू असून या ग्रहावर माणूस नेमका राहणार तरी कुठे? याबाबत मोठे अपडेट देखील समोर आले आहे.

   

नासाने तयार केला अंदाजीत नकाशा

नासाकडून मंगळ ग्रहावर मानवी वस्तीसाठी संभाव्य लँडिंग साईट शोधल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय मार्स मॅपिंग मिशनच्या मदतीने या साईट शोधण्यास मदत होत आहे. यासोबतच मंगळ ग्रहावरील खडक आणि भूप्रदेश यांचे सुद्धा परीक्षण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बर्फाळ प्रदेशामध्ये आईस कोरिंगच्या मदतीने मंगळ ग्रहावरील पाणी आणि बर्फ यांच्या मदतीने मानवी मोहिमांसाठी मदत घेतली जाणार आहे. नासा ने बर्फाळ प्रदेश आणि मंगळ ग्रहावरील डोंगराळ प्रदेशांमध्ये संशोधन करून लँडिंग साईटच्या जागेचा अंदाजित नकाशा तयार केला आहे. या लँडिंग साईटचा शोध contest camera (CTX) आणि high resolution imaging experiment ( HIRISE ) यांच्या मदतीने मार्स रिकॉनीसन्स ऑर्बिट च्या मदतीने घेण्यात आला.

मानवी वस्ती निर्माण करणे शक्य?

मंगळ ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे बरेच पुरावे संशोधकांना मिळाले आहे. यासोबतच आता मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करणे शक्य आहे का याबाबत अचूक संशोधन करणे शक्य होईल. मंगळ ग्रहावरच्या वातावरणाबाबत बोलायचं झालं तर पृथ्वीच्या तुलनेमध्ये मंगळ ग्रहावरचे वातावरण बरेच विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग पृथ्वीच्या जमिनी सारखाच असला तरी, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोह आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर दगड, माती, डोंगर, दऱ्या या प्रमाणेच आहेत. मंगळ ग्रहाला लाल ग्रह असं म्हटलं जातं. पण मंगळ ग्रहाला हा लाल रंग लोहाच्या क्षारमुळे आणि गंजामुळे आला आहे.

मंगळ ग्रहावर यामुळे घडतात भूकंप

मंगळ ग्रहावर बऱ्याच भूगर्भीय हालचाली घडत असतात. मंगळ ग्रहावर  घडणारे भूकंप हे उल्कापिंडीची टक्कर झाल्यामुळे घडत असतात असं बऱ्याचदा उघड झालं होतं. परंतु हे भूकंप टेक्टोनिक प्लेट यामुळे होत असतात. टेक्टोनिक प्लेट या अजून देखील मंगळ ग्रहावर सक्रिय आहेत. या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण करणे शक्य आहे का याबाबत अचूक संशोधन आता करण्यात येईल.