टाइम्स मराठी । खरं तर दारू पिणे हे शरीरासाठी चांगलं नसत, त्यामुळे आपल्या शरीराची मोठी हानी होते. परंतु तरीही देशात दारू पिणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. अगदी तरुण मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकजण दारूच्या आहारी गेल्याच आपण पाहतो. देशात दारू पिणाऱ्यांची संख्या इतकी आहे कि, जगात स्कॉच व्हिस्कीचा सर्वाधिक वापर भारतात होतो. एका रिपोर्ट्स नुसार, व्हिस्कीचे भारतीय मद्य बाजारावर वर्चस्व कायम आहे.
जगात सर्वात जास्त विक्री ही व्हिस्कीची होते. त्याच प्रकारे दारूच्या 25 ब्रँड पैकी 13 ब्रँड हे भारतीय आणि टॉप फाईव्ह मध्ये असलेले चार ब्रँड देखील भारतीय आहे. भारतानंतर दुसऱ्या देशांचा यामध्ये नंबर येतो. दारू पिणे हे अत्यंत वाईट आणि शरीरासाठी घातक आहे. परंतु आरोग्याचा विचार न करता दिवस रात्र दारू पिणाऱ्यांची संख्या भारतात कमी नाही. दारूचे वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे ब्रँड्स आहेत. यामध्ये बियर, व्हिस्की, वाईन बऱ्याच प्रकारांचा समावेश होतो. जागतिक एजन्सी IWSR यांनी दिलेल्या डेटा नुसार भारतामध्ये व्हिस्की चा दोन तिहाई हिस्सा आहे. भारतात सर्वाधिक वापरल्या जाणार्या व्हिस्कीची किंमत प्रति बाटली ७५० रुपयांपेक्षा कमी आहे
भारतातील मद्य बाजारपेठ ही जगातील पाचव्या नंबरची बाजारपेठ असून पुढच्या पाच वर्षांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात दारू विक्री बंद करण्यात आली होती. परंतु त्यानंतर हा व्यवसाय पुन्हा रुळावर येऊन यामध्ये 34% वाढ यामध्ये झाली आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये अंदाजे 3.8 टक्के वाढ व्हिस्कीमध्ये होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय बनावटीची ही व्हिस्की 96% बाजारावर नियंत्रण ठेवेल असं सांगण्यात येत आहे. आयात करण्यात आलेल्या व्हिस्की चा वाटा 3.3% असून व्हिस्की मार्केट 2027 मध्ये 3.7 पर्यंत वाढवण्याचा अंदाज आहे.