रेल्वे रुळांमध्ये दगडं का टाकले जातात? कारण वाचून तुमचंही नॉलेज वाढेल

टाइम्स मराठी । आपण ट्रेनमधून प्रवास करत असताना रेल्वे पटरीवर धारदार दगड टाकण्यात आल्याचं आपल्याला दिसते. हे धारदार दगड का टाकण्यात आले असतील ? त्याचबरोबर रेल्वे रुळ रेल्वेचे वजन कसं पेलत असेल? असे प्रश्न तुम्हाला देखील पडत असतील. तर आज आपण जाणून घेऊया रेल्वे पटरीवर टाकण्यात येणाऱ्या या धारदार दगडाचे नेमकं कारण.

   

तर मित्रांनो, आपण रेल्वे पटरीवर रुळाच्या मध्यभागी एक सिमेंट ची पट्टी टाकलेली पाहतो. त्या पट्टीला स्लीपर असं म्हटलं जातं. रुळावर कोणताही तान पडू नये आणि ट्रेनचे वजन व्यवस्थित हँडल करता यावं यासाठी रुळाच्या मध्यभागी ही पट्टी लावल्या जाते. त्याचबरोबर रुळाच्या साईडला धारदार दगड टाकण्यात आलेले असतात. हे धारदार दगड त्याठिकाणी टाकण्या मागचे 2 महत्त्वाचे कारण आहे. एक म्हणजे ट्रेनचा समतोल राखण्यासाठी आणि दुसरा म्हणजे रेल्वे अपघात टाळण्यासाठी याचा वापर केला जातो.

जेव्हा रेल्वे भरधाव वेगाने चालते तेव्हा रुळावर टाकण्यात आलेले धारदार दगड एकमेकांना चिपकून राहतात. त्यामुळे ट्रेनचे बॅलन्स बनून राहते. त्याचबरोबर रेल्वे रुळावरून बऱ्याच बोगी जात असतात. आपण जर रेल्वे स्थानकावर उभे असल्यावर आपल्याला रेल्वे आल्यावर कंपन जाणवतात. या कंपन आणि रेल्वेच्या आवाजामुळे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या इमारतींना काही नुकसान पोहोचू नये आणि अपघात होऊ नये यासाठी देखील या धारदार दगडांचा वापर केला जातो. त्याचबरोबर या धारदार दगडांमुळे रेल्वे रुळावर किंवा त्याच्या आजूबाजूला गवत आणि झाडांची वाढ होण्यापासून वाचवते.

रेल्वे रुळावर गोलाकार आकाराचे दगड वापरले जात नाही तर धारदार दगडांचा वापर केला जातो. कारण धारदार दगड तीक्ष्ण असल्यामुळे एकमेकांना चिकटून राहतात. त्याचबरोबर पावसाच्या किंवा पूर परिस्थितीमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचले जाऊ नये यासाठी रुळांमध्ये गिट्टी टाकली जाते.