टाइम्स मराठी | अवकाशात पृथ्वी, ग्रह, तारे याशिवाय उल्का सारख्या बऱ्याच गोष्टी आहे. आपण राहत असलेल्या पृथ्वी बद्दल (Earth) आपल्याला बऱ्याच रहस्यमयी गोष्टी माहिती नाही. पृथ्वी वरील जीवसृष्टी, झाडे, वेली, प्राणी, पशु पक्षी, सर्व काही निसर्गरम्य आहे. त्याचबरोबर पृथ्वीवर बऱ्याच रहस्यमयी गोष्टी आणि खगोलीय घटना घडल्या आहेत.वैज्ञानिक अशा घटनांचा सतत शोध लावत असतात.
आपल्या सर्वांना माहिती आहे पृथ्वी गोल आहे. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. त्यानुसार तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की पृथ्वी फिरत असते तर आपल्याला हे जाणवत का नाही? आणि आपण पृथ्वी फिरत असताना पडत का नाही. एवढेच नाही तर पृथ्वीच्या खालच्या टोकाला असलेल्या भागांमध्ये राहणारे व्यक्ती स्थिर कशी राहत असतील असे बरेच प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात.
या प्रश्नांची उत्तरे आपण बऱ्यापैकी शोधण्याचा प्रयत्न करतो. या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला सायन्स मध्ये मिळत असतात. आपल्याला पडलेल्या प्रश्नांचा उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. शाळेत असताना आपल्याला गुरुत्वाकर्षण याबद्दल माहिती दिलेली होती. त्याच गुरुत्वाकर्षणामुळे आपण पृथ्वीवर स्थिर राहतो. ज्या प्रकारे पृथ्वी फिरत असते त्याच प्रकारे पृथ्वी सोबत आपण देखील फिरतो. पृथ्वीवर असलेले सर्व पशु, पक्षी, झाडे, झुडपे पृथ्वी सोबत फिरत असतात.
पृथ्वी आपल्या अक्षावर 24 तास फिरत असते. पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड हा 1600 किलोमीटर एवढा आहे. पृथ्वीचा हा वेग स्थिर असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. जर पृथ्वी थांबली किंवा पृथ्वीने फिरणे थांबवले, पृथ्वीचा वेग अचानक वाढला, किंवा कमी देखील झाला तर आपल्याला जोरदार धक्का बसू शकतो.