गाड्यांचे इंजिन समोरच्याच बाजूला का असते? यामागील लॉजिक माहितेय का?

टाइम्स मराठी | आपण कुठेही जात असताना कार चालवतो. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की गाड्यांचे इंजन पुढच्या बाजूलाच का दिले जाते? पण खरंच याच्यामध्ये काहीतरी लॉजिक किंवा सायन्स असणार हे नक्कीच…. ,चला आज आपण याचबाबत माहिती घेऊन आपलं जनरल नॉलेज वाढवूया….

   

गाड्यांच्या समोरच्या साईडला इंजिन असणे ही सर्व साधारण गोष्ट आहे. मास प्रोडक्शन कार मध्ये अशाप्रकारे समोरच्या साईडला इंजन दिले जाते. पण सर्वच कारचे इंजिन समोरच्या साईडला नसून 100 पैकी 90 गाड्यांचे इंजन हे पुढच्या साईडला असते. आणि 10 टक्के गाड्यांची इंजन हे मागच्या साईडला देण्यात आलेले असते. ज्या कारचे इंजन हे मागच्या साईडला दिलेले असते ते सर्वसाधारण गाड्यांपेक्षा वेगळ्या प्रकारचे असतात. त्यातही बऱ्यापैकी स्पोर्ट कारला मागच्या साईडने इंजन दिले जाते.

एक्सेसिबिलिटी वाढते-

समोरच्या साईडने इंजन असलेल्या म्हणजेच फ्रंट साईड इंजिन असलेल्या गाड्या चालवणं सोप्प असतं. कारण इंजिनचे वजन हे समोरील चाकावर असतं. त्यामुळे अंडरस्टेयर होण्याची शक्यता नसून ओव्हर स्टेअर होऊ शकते. पण त्याला मॅनेज करणे हे एवढं अवघड नसते. त्याचबरोबर या फ्रंट साईड इंजिन असलेल्या गाडीमुळे एक्सेसिबिलिटी वाढते. या गाड्यांची सर्विसिंग सोपी असते.

इंजिनला कुलिंग मिळते

फ्रंट साइड इंजिन असलेल्या गाड्यांचे रेडिएटर चांगले आणि कूलिंग करण्यास सक्षम होते. कारच्या पुढच्या ग्रिलमधून हवा पास होत असते. त्यामुळे इंजिन आणि रेडिएटरपर्यंत ती पोहोचते, ज्यामुळे कूलिंगची कार्यक्षमता वाढते.

गाडीचे इंजिन समोरच्या बाजूला असल्याने संपूर्ण भार समोरच्या बाजूला पडतो, ड्रायव्हिंग करणं सोप्प पडत आणि महत्त्वाचे म्हणजे गाडी चालवत असताना स्टेअरिंग वर कंट्रोल सुद्धा चांगला राहतो. फ्रंट व्हील ड्राईव्ह कारमधील इंजिन टायर्स जवळ असल्यामुळे तयार होणार्‍या ऍलर्जीचे नुकसानही होत नाही. स्पोर्ट गाड्यांना सहसा मागच्या साईडने इंजिन दिले जाते. त्यामुळे या गाड्यांचा बॅलन्स मागच्या चाकावर असतो.