लग्नानंतर बायको नवऱ्याला धोका का देते? ही धक्कादाक कारणे तुम्हालाही माहिती असायलाच हवीत

टाइम्स मराठी । लग्न हे एक पुरुष आणि स्त्री मधील सामाजिक बंधन आपण म्हणू शकतो. हिंदू धर्मात असं मानलं जातं की, जेव्हा एका पुरुषाचं लग्न महिलेसोबत होतं, तेव्हा त्यांच्या दोघांचं नातं हे एक बंधन प्रमाणे असतं. परंतु बऱ्याच नात्यांमध्ये कपल्स एकमेकांसोबत खुश राहत नाही. त्यामुळे ते आपल्या जीवनसाथीला धोका देतात. गेल्या काही दिवसांपासून लग्न झालेल्या महिला एखाद्या व्यक्तीसोबत पळून गेल्याच्या घटना प्रचंड वाढत आहेत. बऱ्याचदा पती-पत्नीच्या नात्यांमध्ये पती आपल्या पत्नीला धोका देतो, परंतु आज-काल पत्नीने पतीला धोका दिल्याच्या घटना खूप वाढत आहेत. आणि यामध्ये महिलांचे प्रमाण पूर्वीपासूनच जास्त आहे. हे असं का होत असेल याचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत.

   

लग्नाच्या अगोदर प्रेम असणे

आज-काल लव मॅरेज ला तरुणांची जास्त पसंती आहे. परंतु लव मॅरेजला घरच्यांकडून विरोध असल्यामुळे बऱ्याच मुली प्रेम करत असलेल्या मुलासोबत पळून जातात. तर काही मुली लग्न अगोदर प्रेम असताना देखील त्या मुलाला सोडून आई वडिलांचा विचार करतात. आणि आई वडील सांगतील त्या मुलासोबत लग्न करायला तयार होतात. म्हणजेच त्या अरेंज मॅरेज करतात. परंतु लग्न झाल्यावर दुसऱ्या कोणावर प्रेम करत असल्यामुळे ते नवऱ्यावर प्रेम करू शकत नाही. त्यामुळे या लग्न झालेल्या मुली नवऱ्यापासून लांबच राहतात. अशामुळे दुरावा निर्माण होतो आणि काही वेळानंतर त्या मुली नवऱ्याला धोका देण्याचा विचार करतात तर बऱ्याच मुली लग्न झाल्यावर काही दिवसांनी पळून देखील जातात.

अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे

लग्न झाल्यावर नवरा बायकोच्या एकमेकांकडून प्रचंड अपेक्षा असतात. जर नवरा आपल्या बायकोच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तेव्हा समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे भांडण देखील होतात. अशावेळी रोजच्या भांडणाला कंटाळून बायको नवऱ्याला धोका देण्याचा विचार करू शकते.

फिजिकली सॅटिस्फाइड न होणे

नवरा बायको मध्ये शारीरिक संबंध हे असतात. परंतु बऱ्याचदा नवरा बायकोला फिजिकली सॅटिस्फाइड करू शकत नाही. अशावेळी देखील बायको नवऱ्याला सोडून जाण्याचा विचार करत असते. फिजिकल सॅटिस्फाइड नसल्यामुळे बायको शेजारी किंवा बाहेरच्या पुरुषांकडे आकर्षित होते. त्यामुळे एक्स्ट्रा मेरिटल अफेअर सुरू होतं. याची कल्पना नवऱ्याला सुद्धा नसते. याच प्रेमसंबधानंतर काही दिवसांनी बायको नवऱ्याला धोका देऊन परपुरुषा सोबत पळून सुद्धा जातात.