स्मार्टफोनच्या चार्जिंग सॉकेट च्या साईडला बारीक छिद्र का असते? जाणून घेऊया त्याचे महत्व

टाइम्स मराठी | प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करतो. अन्न वस्त्र निवाऱ्याप्रमाणे आता स्मार्टफोन देखील गरजेचा झाला आहे. त्यातच हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत किंमत असलेल्या स्मार्टफोन सध्या उपलब्ध असून प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले आहे. यासोबतच वेगवेगळे एप्लीकेशन देखील उपलब्ध असतात परंतु त्याचा वापर आपण करत नाही. तुम्ही स्मार्टफोन घेतल्यावर चार्जिंग होल च्या शेजारी एक बारीक छोटा होल बघितले असेल. परंतु तुम्हाला त्या होल चा काय फायदा असतो हे माहीत नसेल. तर आपण आज जाणून घेणार आहोत या होल बद्दल

   

प्रत्येक स्मार्टफोन वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेला असतो. बऱ्याचदा स्मार्टफोन खालच्या साईडने चार्जिंग सॉकेट, हेडफोन पिन आणि त्याच्या शेजारी एक बारीक होल दिले जाते. तर बऱ्याच स्मार्टफोनमध्ये हे होल स्मार्टफोनच्या वरच्या बाजूला दिले जाते. या होलचं महत्व साधारण असलं तरीही स्मार्टफोनच्या बाबतीत हे छोटं होल अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा आपण प्रवास करत असताना प्रचंड ट्रॅफिक असते. त्यावेळी आपल्या आजूबाजूचा आवाज स्मार्टफोन मधून दुसऱ्या व्यक्तीला ऐकू येत नाही फक्त आपला आवाज त्या व्यक्तीला ऐकू येतो.

हे का होत असेल याचा विचार केला तर आपल्याला या छोट्या होलचे महत्व समजेल. या होलच्या माध्यमातून प्रवासात ऐकू येणारा आजूबाजूचा आवाज कॅच न करता फक्त कॉल वर बोलत असलेल्या व्यक्तीचा आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे काम या छोट्याशा होलमुळे केले जाते. या अति महत्त्वाच्या पण छोट्याशा होलचं नाव आहे नाईस कॅन्सलेशन मायक्रोफोन. एखादा कॉल आल्यास हे स्वयंचलित पद्धतीने काम करते. त्यामुळे आपण कितीही गर्दीत असलो तरीही कॉल वर असलेल्या व्यक्तीला आपला आवाज पोहोचतो. आणि आपल्याला द्यायचा असलेला संदेश कॉलवर असलेल्या व्यक्तीला समजतो.