टाइम्स मराठी । आपण मोबाईलमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी डाटा प्लान (Data Plan)चा वापर करत असतो. परंतु कम्प्युटर आणि लॅपटॉप वापरण्यासाठी wifi ला जास्त प्राधान्य दिले जाते. आपण मोबाईलचा डेटा लॅपटॉप ला कनेक्ट करतो. परंतु बऱ्याचदा मोबाईलचा डेटा संपल्यावर आपल्याला इंटरनेट वापरता येत नाही. अशावेळी आपल्याकडे wifi हा ऑप्शन उपलब्ध असणे गरजेचे वाटते. बऱ्याचदा तुम्ही तुमचा डाटा संपल्यावर फ्री वाय-फाय नेटवर्क शोधत असाल. परंतु आज काल सर्व वाय-फाय ला पासवर्ड (Wifi Password) लावलेले असतात. त्यामुळे कोणीही त्यांचा वायफाय वापरू शकत नाही. पण तुम्ही वायफाय चा पासवर्ड एका ट्रिकने जाणून घेऊ शकता.
- जर तुम्हाला लॅपटॉप साठी किंवा कम्प्युटर साठी वायफाय पासवर्ड जाणून घ्यायचा असल्यास विंडो सिस्टीम मध्ये जाऊन विंडो या आयकॉन सोबतच R हे बटन दाबा.
- त्यानंतर CMD टाईप करून ओके या बटणावर क्लिक करा. 3.
- त्यानंतर neth wlan show profile name (wifi name) हे टाईप करा.
- Wifi name मध्ये तुम्हाला सिस्टीम ला कनेक्टेड असलेला वायफाय नाव टाकावे लागेल.
- जेव्हा तुम्ही वायफायचं नाव लिहाल त्यानंतर key=clear टाईप करून एंटर करा.
- एंटर केल्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी सेटिंग हे ऑप्शन दिसेल. यानंतर key=clear या ऑप्शन नंतर wifi चा पासवर्ड त्या ठिकाणी दिलेला असेल.
जर तुम्हाला मोबाईल मध्ये वायफाय चा पासवर्ड जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे. हे सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर तुम्ही मोबाईलच्या वायफाय चा पासवर्ड मिळवू शकतात.जर तुम्ही पेटीएम वापरत असाल तर तुम्हाला सोप्या पद्धतीने वायफाय चा पासवर्ड मिळू शकतो.
- तुमच्या मोबाईलला कनेक्टेड असलेला वायफाय समोरील QR code वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला एक क्यूआर कोड दिसेल. हा क्यूआर कोड तुम्ही पेटीएम वर जाऊन स्कॅन करा.
- त्यानंतर तुम्हाला नवीन पेमेंट साठी पेमेंट ऑप्शन निवडावे लागेल. म्हणजेच पेमेंट कोड वरील स्कॅनर आणि पे पर्याय स्कॅन करा.
- त्यानंतर तुम्हाला वायफाय पासवर्ड दाखवल्या जाईल.
- पेटीएम प्रमाणेच तुम्ही गुगल पे स्टोअर वरून क्यूआर कोड स्कॅनर च्या मदतीने देखील वायफाय पासवर्ड मिळवू शकतात.