ChatGPT मुळे नोकऱ्यांवर गदा येणार? AI CEO च्या उत्तराने तुमच्याही पोटात गोळा येईल

टाइम्स मराठी । नुकतेच भारतात AI चे Chatgpt ॲप लॉन्च करण्यात आले आहे. आता इथून पुढे Chatgptॲप अँड्रॉइड फोन मध्ये सहजरित्या वापरता येणार आहे. या ॲपद्वारे सर्व जूना डेटा ही सेव्ह केला जाऊ शकतो. मुख्य म्हणजे, AI मुळे मनुष्यबळ ही कमी वापरले जाऊ शकते. त्यामुळेच AIच्या येण्याने मार्केट मध्ये लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात का? हा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याच प्रश्नाचे स्पष्टीकरण ओपन AI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी दिले आहे. सॅम ऑल्टमन यांनी असं उत्तर दिले आहे ज्यामुळे तुमच्याही पोटात गोळा येईल.

   

The Atlantic या मॅक्झिनला दिलेल्या मुलाखतीत सॅम ऑल्टमन यांनी म्हणले आहे की, “अनेक लोक म्हणत आहेत की एआयचा प्रभाव चांगला असेल आणि त्याचा नोकरीवर परिणाम होणार नाही. मात्र, हे असत्य आहे. AI आगामी काळात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि याचा अनेकांच्या नोकरीवरही परिणाम होणार आहे. पुढील काळात माणसांबरोबर AI टूल्स देखील अस्तित्वात असतील जे सर्व काम करण्यास सक्षम असतील”

त्याचबरोबर, “आता कंपनी चॅट GPT वरून आणखीन एक पॉवरफुल एआय टूल बनवण्याच्या तयारीत आहे. परंतु अजून लोक त्यासाठी तयार नाहीयेत. मात्र भविष्यात माणसांना AI च्या टूल्सला देखील स्वीकारावे लागेल आणि त्यांच्यासोबत काम करावे लागेल हे तितकेच सत्य आहे” असे सॅम ऑल्टमन यांनी सांगितले आहे. सध्या AI चे टूल्स बाजारात येत असल्यामुळे या टूल्समुळे माणसांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता परतवली जात आहे. याबाबत तज्ञांकडून देखील अनेक वेगवेगळी स्पष्टीकरणे देण्यात आली आहेत.

नुकतेच कोलंबिया बिझनेस स्कूलचे प्राध्यापक ओडेड नेत्झर यांनी सांगितले आहे की, “लोकांना आता भीती वाटते की AI त्यांच्या नोकऱ्या काढून घेईल परंतु सर्वात मोठा धोका हा आहे की जेव्हा एखाद्याला AI ची क्षमता पूर्णपणे समजेल आणि माहित असेल तेव्हा नोकऱ्या जाण्याची शक्यता जास्त असेल. यामुळेच लोकांना AI चे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचं आहे. ज्या लोकांना AI चे टूल्स वापरता येणार नाही त्यांची नोकरी जाण्याची जास्त शक्यता आहे”