टाइम्स मराठी । ट्विटर टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांच्या जीवनाशी संबंधित एक माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. एलन मस्क यांच्या वडिलांच्या मते, त्यांच्या अरबपती मुलाची हत्या होऊ शकते. द युएस सन या वृत्तपत्राला माहिती देताना त्यांनी त्यांच्या मनातील भीती बोलून दाखवली. एलन मस्क यांनी द न्यूयॉर्कर यामध्ये नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखावर टीका केली होती. या लेखामध्ये युक्रेनमध्ये होणाऱ्या युद्धबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावर मत मांडण्यात आले होते.
52 वर्षाचे एलन मस्क सध्या बऱ्याच कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत. त्याचबरोबर ज्याप्रकारे कायदेशीर खटले वाढले, त्याप्रकारे प्रेसच्या नकारात्मक बातम्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे प्रचंड चिंता वाढली असल्याचे एलन मस्क यांनी सांगितलं. यापूर्वी एलन मस्क यांनी रहस्यमय परिस्थितीमध्ये माझा मृत्यू होऊ शकतो असं गमतीने सांगितलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, टेक्सास मध्ये एलन मस्क यांची हवेली बांधण्यासाठी टेस्ला कंपनीच्या फंडचा वापर केल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार सरकारी वकील तपास करत आहे. याबाबत जुलै महिन्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडेन यांनी तपास करण्याचे सांगितले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आणि सौदी अरब समूहाच्या मदतीने आता ट्विटर खरेदीवर एलन मस्कची तपासणी केली जाऊ शकते.
पेंटागॉन यांच्या अधिकाऱ्यांनी द न्यूयॉर्कर यांना सांगितलं होतं की, एलन मस्क यांच्यासोबत अनिर्वाचित अधिकारी यांच्यासारखा व्यवहार करण्यात आला होता. युक्रेन युद्धामध्ये स्पेस एक्सचे स्टार लिंक सॅटॅलाइट किती महत्त्वपूर्ण आहे. हे देखील सांगण्यात आले होते. त्याचबरोबर एलन मस्क यांच्या वडिलांना युक्रेन सरकार त्यांच्या मुलाची हत्या करेल अशी भीती आहे का असं विचारल्यानंतर त्यांनी हो मध्ये उत्तर दिले.
मे महिन्यामध्ये स्पेस एक्सच्या युक्रेनियन सैनिकांना स्टार लिंग टर्मिनल प्रदान करण्याच्या निर्णयावरून रशियाच्या स्पेस चीफ सोबत वाद झाल्यानंतर एलन मस्क यांनी गमतीने त्यांचा मृत्यू गुढ परिस्थितीमध्ये होऊ शकतो असं सांगितलं होतं. मे महिन्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये जुन्या कार्यालयाच्या शेजारी एक स्नानगृह बांधण्याची विनंती एलन मस्क यांनी केली होती. जेणेकरून बॉडीगार्डला मध्यरात्री जागे करावे लागणार नाही. एका इंजिनियर ने बीबीसीला एकदा सांगितलं होतं की, एलन मस्क यांचे बॉडीगार्ड बाथरूम मध्ये देखील एलन मस्क यांच्यासोबतच फिरत असतात.
एलन मस्क यांच्या सुरक्षेबाबत भीती डिसेंबर महिन्यापासून सुरू आहे. कारण त्यावेळी एलन मस्क यांचे खाजगी जेट ट्रॅक करण्यात आले होते. त्याचबरोबर ज्या पत्रकारांनी सोशल मीडियावर एलन मस्क च्या जेटची ट्विटर अकाउंट वर लिंक शेअर केली होती त्यांना ट्विटर वरून ब्लॉक करण्यात आले होते. आणि त्यांच्यावर एलन मस्करी यांनी नुकसान पोहोचल्याचा आरोप लावला होता. यासोबतच एकदा एलन मस्क यांच्या मुलाला घेऊन जाणाऱ्या कारचा देखील एका व्यक्तीने पाठलाग केला होता. त्या व्यक्तीला टेस्लाचे सीईओ या कार मध्ये बसलेले असल्याचं वाटलं होतं.