जगाचा अंत होणार? या 5 धर्मांनी केल्या वेगवेगळ्या भविष्यवाण्या

टाइम्स मराठी । ज्या प्रकारे जन्म मृत्यू हे चक्र सुरू आहे, त्याच प्रकारे जगाचा नाश होणार असल्याचे देखील बरेच जण सांगतात. जगाचा नाश होणे म्हणजे पृथ्वीवर असलेल्या जीवनाचा नाश होणे. म्हणजेच पृथ्वीवर असलेल्या सर्व गोष्टींचा नाश होणे. याबाबत जगातील बऱ्याच धर्मांनी हॉलोकॉस्ट चा उल्लेख करून व्याख्या सांगितल्या आहे. याला अपवाद म्हणजे आतापर्यंत या धर्मांनी जगाच्या नाश होण्याबद्दल सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरलेली नाही. त्याचबरोबर जीवनाचा नाश झाल्यानंतर काय होईल हे देखील स्पष्टपणे सांगितलेले नाही. परंतु आज आपण जाणून घेणार आहोत या पाच धर्मात विनाशा बद्दल काय भविष्यवाणी करण्यात आली आहे.

   

1) बौद्ध

बौद्ध धर्मानुसार जेव्हा सर्व धर्मातील आणि जातीतील लोक नाश पावतील त्यानंतर सुमारे 4600 वर्षानंतर प्रलय येईल. त्यावेळी क्षितिजात एकेक करून सहा सूर्य दिसतील. आणि त्यानंतर जग आगीच्या गोळ्याप्रमाणे नष्ट होईल. यावेळी पूर्ण पृथ्वी नष्ट होईल.

2) इसाई धर्म

या धर्मा नुसार, जीवनाच्या शेवटच्या दिवशी सर्व मृत आणि जीवित लोकांना आकाशात नेले जाईल. त्या ठिकाणी सर्व जीजसला भेटतील. या धर्मामध्ये प्रलय च्या भविष्यवाणीवर सांगण्यात आलं आहे की, ज्याप्रकारे वैज्ञानिक युगामध्ये विश्वास करणे मुश्कील आहे त्या प्रकारे प्रलय होईल की नाही याबाबत आणखीन कोणते पुरावे मिळाले नाही.

3) हिंदू

हिंदू धर्मानुसार करण्यात आलेल्या भविष्यवाणी मध्ये सांगण्यात आलं आहे की, प्रलय नंतर भगवान विष्णू शेवटचे परत येतील.भगवान विष्णूला हिंदू धर्मामध्ये कलकी म्हंटल जाते. कल की हे भगवान विष्णूचे अंतिम अवतार मानले जाते. त्याचबरोबर जीवनातील लोकांचे पाप जेव्हा प्रचंड प्रमाणात वाढेल तेव्हा भगवान विष्णू पांढऱ्या घोड्यावर सवार होऊन येतील. त्यावेळी त्यांच्या हातात तलवार असेल. या तलवारीने ते वाईटाचा अंत करतील.

4) जुडेज्म

या धर्मानुसार प्रलय आल्यानंतर ईश्वर सर्व मृत लोकांचे शरीर नव्याने निर्माण करेल. आणि त्यानंतर ईश्वर सर्वांना उभे करून त्यांच्या कर्म कृत्यांची शिक्षा देईल. या धर्मामध्ये असं सांगण्यात येतं की, मृत व्यक्तींचा आत्मा देवाच्या जवळ जातो.

5) जोराष्ट्रीयन

झोराष्ट्रियन या धर्माने केलेल्या भविष्यवाणीनुसार प्रलय येण्यापूर्वी संपूर्ण जग पवित्र होईल. यासोबतच प्रलय येण्यापूर्वी देव आणि राक्षसांमध्ये शेवटचा आमना सामना होईल. आणि युद्ध होईल. या युद्धामध्ये देव जिंकतील. त्यानंतर देव पूर्वीप्रमाणे संपूर्ण जग पुन्हा एकदा निर्माण करतील. त्याचबरोबर जोराष्ट्रीयन सिद्धांतानुसार, या प्रलयानंतर सर्व मृत झालेले लोक कबरीतून उठून देवाकडे आपल्या कर्माचा हिशोब करतील. त्यानंतर देवाच्या नियमाप्रमाणे पालन करून जो व्यक्ती जीवन जगला असेल त्यांना मुक्ती मिळेल. आणि पापी लोकांना ज्वालामुखी मधून निघणारा आगीचा गोळा खावा लागेल.