आता AI च्या मदतीने Tinder App वर पार्टनर शोधणं होणार सोप्प ; कसं ते पहा

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा (Artificial Intelligence) वापर होताना दिसत आहे. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, अशा बऱ्याच कंपन्या आता आर्टिफिशल इंटेलिजंट द्वारे काम करण्याचा विचार करत आहे. त्यातच आता ऑनलाइन डेटिंग ॲप टिंडर ने (Tinder) देखील बाजी मारली आहे. आता तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या माध्यमातून टिंडर वर पार्टनर शोधण्यासाठी मदत होणार आहे. आतापर्यंत तुम्हाला जर टिंडर वर पार्टनर मिळत नसेल तर आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या मदतीने कमी वेळेत तुम्हाला तुमचा पार्टनर मिळू शकेल.

   

टिंडर हे ॲप ऑनलाइन पार्टनर शोधण्यासाठी मदत करत असते. आता हे ॲप आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर करून नवीन फीचर लॉन्च करणार आहे. सध्या या फिचर वर काम सुरू आहे. या ॲपच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजंट फक्त पार्टनर शोधण्यासाठीच मदत करणार नसून टिंडरवर तुमची प्रोफाइल परफेक्ट बनवण्यासाठी देखील मदत करणार आहे. तुमच्या अल्बम मधील सर्वात पाच स्पेशल फोटोज निवडून आर्टिफिशल इंटेलिजन्स तुम्हाला प्रोफाईलवर सेट करण्यास मदत करणार आहे.

टिंडर या ॲप चे मालक, मैच ग्रुपचे मुख्य कार्यकारी बर्नार्ड किम यांनी आर्टिफिशल इंटेलिजंटच्या या फिचर बद्दल सांगितलं की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या वापरामुळे युजर्सचे चिंता कमी होऊन ते त्यांचा प्रोफाइल परफेक्ट तयार करू शकतील. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या ॲपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित वेगवेगळे फीचर्स उपलब्ध होणार असून यामुळे लोकांचा डेटिंग अनुभव मोठ्या प्रमाणात वाढेल.

मागच्या महिन्यामध्ये टिंडरचे चीप प्रॉडक्ट ऑफिसर मार्क वाण रिस्कीव यांनी सांगितलं होतं की, टिंडर ॲप यूजर ला त्यांचा बायो लिहिण्यासाठी जेनरेटिव्ह AI मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. त्याचबरोबर युजर्स आर्टिफिशल इंटेलिजंट च्या मदतीने त्यांच्या इंटरेस्ट नुसार आणि रिलेशनशिप गोल नुसार बेस्ट बायो बनवू शकतील. यामुळे त्यांना लवकरच त्यांचा पार्टनर मिळू शकेल. मार्केटमध्ये स्पर्धा करण्यासाठी टिंडर या ॲप मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात येत आहे. टिंडरपूर्वी बाकीच्या रेटिंग ॲप्स मध्ये देखील AI सपोर्ट उपलब्ध आहे. आर्टिफिशियल इंटेलिजंटचा वापर कंपन्यांसह बऱ्याच ॲपमध्ये देखील केला जातो. टिंडर प्रमाणे काही डेटिंग ॲप वर सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात येत असून पार्टनर शोधण्यासाठी मदत करत आहेत.