AI मुळे स्वप्नातला जोडीदार मिळणे होणार शक्य; डिजिटल पार्टनर करणार तुमच्या सर्व इच्छा पुर्ण

प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते की त्याला त्याच्या स्वप्नातला जोडीदार मिळाला. परंतु अनेकांचा याबाबतीत अपेक्षा भंग पावतो. मात्र आता इथून पुढे AIच्या तंत्रज्ञानामुळे स्वप्नातला जोडीदार प्रत्यक्षात मिळवणे सहज सोपे होणार आहे. AI च्या मदतीने आपल्याला स्वप्नातील जोडीदार डिझाइन करता येणार आहे. कारण की, AI ने आता आपल्याला परफेक्ट पार्टनर मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे.

   

यासाठी एआयकडून “रोमँटिक एआय गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड” प्रदर्शित करण्यात आली आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेल्या Andreessen Horowitz नावाच्या कंपनीनं AI सोबत एक प्रयोग राबविण्यात आला आहे. याबाबतची माहिती GitHub वरती शेअर करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तुम्ही एआय मॉडेल निवडून तुम्ही त्याला तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता. तसेच त्याला सर्व इच्छा सांगून तुम्ही तुमचा जोडीदार निवडू शकता.

AI कडून राबविण्यात आलेल्या या प्रयोगात एव्हलिन नावाची एक मुलगी सादर करण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही या मुलीला तुम्हाला हव्या तश्या पद्धतीने डिझाईन करू शकता. यामध्ये तुम्हाला जर तुमच्या पसंतीची मुलगी भेटली नाही तर तुम्ही यामध्ये देखील बदल करू शकता. इतकेच नव्हे तर, चॅटबॉट्सच्या माध्यमातून तुम्ही रोमँटिक संबंध शोधण्यासाठी ही प्रयत्न करू शकता. ही एव्हलिन मुलगी तुम्हाला तुमच्या इच्छा जाणून घेण्यासाठी मदत करेल. तसेच या संबंधित तुम्हाला इतर पर्याय सुचवण्यासाठी देखील मदत करेल.

Andreessen Horowitz कंपनीच्या म्हणण्यानुसार, एआय तंत्रज्ञान जरी तुम्हाला डिजिटल पार्टनर निवडून देत असले तरी वास्तविक रोमान्ससाठी भावनिक संबंध ठेवण्यासाठी तुम्हाला एका व्यक्तीची गरज भासेल. मात्र या प्रयोगामुळे तुम्हाला इच्छेप्रमाणे जोडीदार शोधण्यासाठी मदत होईल. तसेच तुम्हालाही तुमच्या इच्छा समजतील. अशा अनेक गोष्टींसाठी AI ने डिजिटल पार्टनरचा प्रयोग केला आहे.