World Photography Day मागील इतिहास काय? जाणून घ्या एका क्लिकवर

टाइम्स मराठी | आज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day) आहे. आपल्या आयुष्यातील अनेक आनंदाचे, दुःखाचे क्षण टिपण्यामध्ये कॅमेरा सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. कॅमेरा दोन टिपण्यात आलेले फोटो नेहमी आपल्याजवळ राहतात. फोटो हा आपल्या सुंदर क्षणांची आठवण जपत असतो. त्यामुळे आजच्या फोटोग्राफी डे ला खूप महत्त्व आहे. आजचा फोटोग्राफी डे संपूर्ण जगभरात अगदी उत्साहात साजरी करण्यात येतो. वेगवेगळ्या ठिकाणी आजच्या दिवशी अनेक सेशन्स, कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. त्यामुळे आपण देखील आजच्या फोटोग्राफी डेनिमित्त त्या मागची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत.

   

‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ इतिहास– (World Photography Day)

जी गोष्ट आपल्याला चार शब्दांमध्ये सांगता येत नाही. ती गोष्ट आपण एका फोटोच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत समोरच्या व्यक्तींपर्यंत पोहचवू शकतो. त्यामुळेच या फोटोग्राफीचे महत्त्व पटवून देण्यासाठी 1939 पासून फोटोग्राफी डे साजरी करण्यास सुरुवात झाली. सर्वात प्रथम फ्रान्समधील जोसेफ नीसफोर निपसे आणि लुईस डॅगुएरे नावाच्या दोन व्यक्तिंनी ‘डॅगुएरोटाइप’ चा (पारा वाष्प तयार करून फोटोग्राफिक प्रक्रियेद्वारे घेतलेले छायाचित्र) शोध लावून फोटोग्राफीच्या विकासाला सुरुवात केली. 9 जानेवारी 1837 रोजी फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सने अधिकृतपणे डॅग्युरिओटाइपचा शोध जाहीर केला. या घोषणेच्या दहा दिवसानंतर फ्रेंच सरकारने डॅग्युरिओटाइप आविष्काराचे पेटंट खरेदी केले. यानंतर त्याचे महत्व जाणून ते कॉपीराइट न ठेवता जगाला भेट म्हणून समर्पित केले. 19 ऑगस्ट 1939 रोजी याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. म्हणून आजचा दिवस वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणून साजरी करण्यात येतो.

1839 मध्ये विल्यम हेन्री फॉक्स टालाबॉटने छायाचित्र काढण्याचे प्रक्रिया सोपी केली. टालाबॉट यांनी कागदावर फ्रेंडच्या माध्यमातून छायाचित्र छापण्याची प्रक्रिया शोधून काढली. मुख्य म्हणजे, अमेरिकेचे फोटो प्रेमी रॉबर्ट कॉर्नेलियस हे जगातील पहिले सेल्फी क्लिक करणारे व्यक्ती देखील मानले जातात. त्यांनी सर्वात प्रथम 1839 मध्ये पाहिला सेल्फी काढला होता. 1991 पर्यंत असा कोणता ही दिवस साजरी करवा कशी कल्पना कोणाच्या ही डोक्यात नव्हती. मात्र 19 ऑगस्ट 1839 मध्ये फोटोग्राफीचा इतिहास दस्तऐवजीकरण करण्यास सुरुवात केल्यामुळे आजचा दिवस वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day) म्हणून साजरी होतो.

‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ चे महत्व

19 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगभरात वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day) साजरी करण्यात येतो. लोकांमध्ये फोटोग्राफीचे महत्त्व समजावे, फोटोग्राफी काढण्यासाठी प्रोत्साहित वाढावे यासाठी ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ साजरी करण्यात येतो. आजच्या दिवशी फोटो प्रेमी वेगवेगळ्या ठिकाणी फोटो सेनिमार राबवतात. या फोटोग्राफीमध्ये देखील अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. सोशल फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी , फोटो जर्नालिझम, फाईन आर्ट फोटोग्राफी, डिजिटल फोटोग्राफी, कँडिड फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी, असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत.