जगातील 8 वा खंड सापडला; 375 वर्षानंतर शास्त्रज्ञांना मोठं यश

टाइम्स मराठी । लहानपणापासून आपण जगात सात खंड असल्याचं ऐकत आलोय. त्यापैकी आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अटलांटिका, आणि आक्र्टिक हे खंड आहेत. परंतु जगात सात नाही तर आठ खंड होते. 375 वर्षांपूर्वी आठवा खंड गायब झाल्याचे सांगण्यात येते. आता वैज्ञानिकांना 375 वर्षानंतर हा आठवा खंड सापडला आहे. म्हणजेच त्यांना हा खंड शोधण्यासाठी 375 वर्षे लागली. हा आठवा खंड अस्तित्वात होता परंतु कोणालाच या खंडाची ओळख पटली नाही. वैज्ञानिकांनी आता कठोर परिश्रम घेऊन हा खंड शोधून काढला आहे. वैज्ञानिकांचे हे आजपर्यंतचे सर्वात मोठे संशोधन असल्याचं मानले जात आहे.

   

काय आहे या खंडाचे नाव

झिलँडिया (Zeelandia) असं या आठव्या खंडाचे नाव असून सध्याचा न्युझीलँड देखील त्याचाच एक भाग आहे. झिलँडिया या खंडाला रिओ ए मोई असं देखील संबोधलं जातं. या खंडाचा बराच भाग हा समुद्राच्या पाण्याखाली असल्यामुळे हा खंड दिसत नव्हता. समुद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या खडकांच्या नमुनांचा अभ्यास केल्यानंतर या महाद्वीपाचा शोध लागला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Zeelandia हे महाद्वीप 50 लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरामध्ये पसरलेले आहे. हा खंड मादागास्कर पेक्षा सहा पट मोठा असून जगातील सर्वात लहान आणि पातळ खंड मानला जात आहे. न्युझीलँड येथील जीएनएस सायन्स या संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ एंडी टूलोच यांचा हा आठवा खंड शोधण्यामध्ये सहभाग होता. जगामध्ये आठवा खंड आहे असं निरीक्षण डच व्यापारी आणि खलाशी अबेल तस्मान यांनी 1642 साली सांगितलं होतं. आणि दक्षिणेकडील मोठा खंड शोधण्याच्या मोहिमेवर ते निघाले होते. न्युझीलँड मध्ये स्थानिक लोकांनी याबाबत बरीच माहिती दिली. आणि 381 वर्षानंतर निरीक्षण आणि संशोधन करून झिलँडिया हा आठवा खंड सापडला.

हा आठवा खंड 55 कोटी वर्षांपूर्वीचा असल्याचे पुरावे भूवैज्ञानिक एंडी टुलोच यांनी दिले आहे. Zeelandia हे एक गोंडवाना नावाचा एक भाग होता असं देखील संशोधक म्हणाले. दक्षिण गोलार्धामधील संपूर्ण क्षेत्र त्याचाच एक भाग मानला जात होता. परंतु काही काळानंतर गोंडवाना बऱ्याच भागांमधून विभक्त झाला आणि बाकीच्या खंडांची निर्मिती झाली. या खंडाचा 94% भाग पाण्याने व्यापलेला असून पृथ्वीवर सध्या न्यूझीलंड सारखी हातावर मोजण्याएवढीच बेटे अस्तित्वात आहेत. झिलँडिया हा आठवा खंड 105 दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवाना पासून विभक्त होण्यास सुरुवात झाली. या खंडाचा एक भाग फुटला आणि समुद्रामध्ये विलीन झाला. 1642 मध्ये पहिल्यांदाच झिलँडिया या आठव्या खंडाची अस्तित्व उघड झाले होते. आणि आता बऱ्याच वर्षानंतर हा खंड वैज्ञानिकांनी शोधला आहे.