खुशखबर!! भारतात होणार WWE चे सामने; तारीख आणि तिकीट दर पहा

टाइम्स मराठी । वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेनमेन्ट म्हणजेच WWE हा खेळ पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात 2017 नंतर पुन्हा एकदा WWE लाईव्ह इव्हेंट होणार आहे. WWE ने याबाबत घोषणा केली असून भारतातील WWE च्या फॅनसाठी ही मोठी खुशखबरी आहे . WWE चे सर्व इव्हेंट खास करून अमेरिकेत आणि अन्य देशात होतात. त्यामुळे WWE च्या भारतीय चाहत्यांना हा इव्हेंट लाईव्ह बघण्याची संधी मिळत नाही. परंतु यावर्षी 8 सप्टेंबर 2023 ला हैदराबाद मध्ये हा इव्हेंट होणार आहे.

   

किती आहे तिकीट किंमत?

हैदराबाद येथील GMC बालायोगी इंडोर स्टेडियममध्ये म्हणजेच गाचीबोवली इंडोर स्टेडियम मध्ये हा इव्हेंट होणार आहे. या इव्हेंट साठी 4 ऑगस्ट पासूनच तिकीट बुकिंग सुरू असून तुम्ही www.bookmyshow.com च्या माध्यमातून तिकीट खरेदी करू शकतात. या शोसाठी सर्वात पहिल्या सीटांची किंमत 15000 रुपये एवढी असून बॅक सीटची किंमत ही 5000 रुपये एवढी आहे. आणि मिडल सीट ची किंमत 12000 रुपये तर बॉटम सीटची किंमत 7500 रुपये ठेवण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे पोस्टर लॉन्च

या इव्हेंट बाबत क्रीडा आणि युवक सेवा मंत्री डॉ. व्ही. श्रीनिवास गौड यांच्यासह युथ ऍडव्हान्समेंट, पर्यटन आणि कल्चरल विभागचे प्रमुख सचिव शैलजा रमय्यार आणि तेलंगणा राज्याचे खेल प्राधिकरण अध्यक्ष डॉ. अंजनेय गौड यांनी रविवारी कार्यक्रमाचे पोस्टर लॉन्च केले. यावेळी मंत्रालयाने सांगितले की, हा कार्यक्रम देशात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये एकूण 28 WWE सुपरस्टार सहभागी होणार असून यापूर्वी हा इव्हेंट 2017 मध्ये इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला होता.

कोणकोणते सुपरस्टार सहभागी होणार?

या इव्हेंट मध्ये वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन सेथ फिक्रीन रॉलीन्स, महिला वर्ल्ड चॅम्पियन रिया रिप्ले, wwe टेक टीम चॅम्पियन्स सॅमी झेन, केविन ओवेंस, जिंदर महल, डू मैकइंटायर, बेकी लिंच, नटाल्या,मैट रिडल, लुडविग कैसर यासारखे सुपरस्टार्स सहभागी होणार आहेत. एवढेच नाही तर या इव्हेंट मध्ये द ग्रेट खली ची देखील एन्ट्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत खुलासा wwe सुपरस्टार नटाल्याने केला.