आता Smart TV मध्ये लाँच होणार X अँप; एलोन मस्क वाढवणार YouTube चे टेन्शन

टाइम्स मराठी । जेव्हापासून एलोन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर ताब्यात घेतलं तेव्हापासून त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. ट्विटरचे नामांतर X करण्यापासून अनेक नवनवीन बदल करत एलोन मस्क यांनी आपले इरादे यापूर्वीच स्पष्ट केले आहेत . आता एलोन मस्क स्मार्ट टीव्ही मध्ये X अँप लाँच करण्याच्या तयारीत आहेत. असं त्याचा मोठा फटका युट्युब ला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

   

सोशल मीडिया वापरकर्ता DogeDesigner ने एक फोटो पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये स्मार्ट टीव्हीच्या आत X प्लॅटफॉर्म दिसत आहे. एलोन मस्क यांनी ही पोस्ट रिट्विट केली आणि लवकरच येत आहे असे लिहिले. यामुळेच आता असा अंदाज लावण्यात येत आहे कि, कंपनी लवकरच स्मार्ट टीव्हीवर X ॲप रिलीज करेल, ज्यावर तुम्ही विडिओ पाहू शकाल. साधय विडिओ फॉरमॅट मध्ये युट्युबचा चांगलाच बोलबाला आहे. आपण युट्युब वरूनच विडिओ बघत असतो. देशातील अनेक प्रोडक्शन हाऊस YouTube च्या माध्यमातूनच त्यांचे व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यामुळे आता टीव्ही वर X अँप आले तर युट्युब ला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

->

मस्कला X वापरकर्त्यांना मोठ्या स्क्रीनवर मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. मागच्या वर्षी जुलैमध्ये मस्कने प्रथमच त्याच्या या योजनेबद्दल खुलासा केला होता. ऑनलाइन कन्टेन्ट वाचकांसाठी आणि जाहिरातदारांना X अधिक आकर्षक बनवण्यासाठी तो सतत नवनवीन डिझाइन्सवर काम करत असतो. आता Google च्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबशी स्पर्धा करण्यासाठी एलोन मस्क स्वतःचे व्हिडिओ प्लॅटफॉर्म X अँप च्या माध्यमातून लॉन्च करत नवीन धक्का देण्याच्या तयारीत आहे.