टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi ने जागतिक बाजारपेठेमध्ये 2 नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहे. Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro असं या दोन्ही मोबाईलची नावे असून कंपनीने आपल्या 13 T सिरीज अंतर्गत हे दोन्ही मोबाईल मार्केट यामध्ये आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन डिझाईन मध्ये सेम असून यामध्ये कोकाकोला ब्रँडिंगसह कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा मोबाईल meadow Green, Black, Alpine Blue या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध असून हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात.
स्पेसिफिकेशन
Xiaomi 13T या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2712 ×1220 पिक्सल रिझोल्युशन आणि 144 hz रिफ्रेश रेट सह येतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 8200 Ultra प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड असून MIUI 14 वर काम करतो.
तर दुसरीकडे Xiaomi 13T pro या स्मार्टफोन मध्ये 6.67 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2712 ×1220 पिक्सल रिझोल्युशन आणि 144hz रिफ्रेश रेट सह येतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 9200 Ultra प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर बेस्ड असून MIUI 14 वर काम करतो.
कॅमेरा
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Xiaomi 13T या मॉडेलमध्ये फोटोग्राफीसाठी sony IMX707 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तसेच या मोबाईल मध्ये 50 मेगापिक्सेलचा सेकंडरी टेलीफोटो सेंसर आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी कंपनीने समोरील बाजूला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर Xiaomi 13T pro मध्येही अशा प्रकारचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
किंमत किती?
Xiaomi 13T या मॉडेलच्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरियंट ची किंमत 57,400 रुपये एवढी आहे. तर Xiaomi 13T pro मॉडेलच्या 12GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 70,700 रुपये एवढी आहे. Xiaomi 13T आणि Xiaomi 13T pro दोन्ही स्मार्टफोन meadow Green, Black आणि Alpine Blue या तीन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.